नवरात्रीत उपवास करत असाल तर लक्षात ठेवा या 6 गोष्टी

देशभरात नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. शनिवारी घटस्थापना असून नवरात्रीला सुरुवात होईल. या दिवसांत अनेकांचे उपवास असतात. मात्र उपवास करताना आरोग्याकडेही तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे. 

Updated: Sep 26, 2016, 08:35 AM IST
नवरात्रीत उपवास करत असाल तर लक्षात ठेवा या 6 गोष्टी title=

मुंबई : देशभरात नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. शनिवारी घटस्थापना असून नवरात्रीला सुरुवात होईल. या दिवसांत अनेकांचे उपवास असतात. मात्र उपवास करताना आरोग्याकडेही तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे. 

नवरात्रीत उपवास करत असाल तर जरुर वाचा 

1. थोड्या-थोड्या वेळाने काही ना काही खात राहा. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहील आणि थकवा जाणवणार नाही.

2. उपवासादरम्यान शरीरात पाण्याची मात्रा योग्य ठेवणे गरजेचे असते. उपवासादरम्या अधिकाधिक पाणी प्यायले पाहिजे. शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी नारळपाणी, लिंबूपाणी, ग्रीन टी तसेच ताक पिऊ शकता.

3. उपवासादरम्यान शरीरात एनर्जी राहण्यासाठी बटाटा, सीताफळ तसेच साबुदाणेही खाऊ शकतो. 

4. नवरात्रीत उपवास असल्यास उपवासाचे तेलकट पदार्थ खाणे टाळा. 

5. फळे, फळांचे ज्यूस यांचे सेवन करा.

6. उपवासादरम्यान गोड खाण्याची इच्छा झाल्यास गूळ अथवा मधाचे सेवन करु शकता.