उन्हाळ्यातही सतेज आणि चमकदार ठेवा तुमच्या त्वचेला!

मेडिकल सर्व्हिसेस तसंच 'आर अॅन्ड बी'च्या उपाध्यक्ष तसंच काया स्किन क्लिनिकच्या प्रमुख डॉक्टर संगीता वेलासकर यांनी सध्याच्या उकडत्या वातावरणात आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी काही छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स दिल्यात.

Updated: Apr 2, 2015, 10:15 AM IST
उन्हाळ्यातही सतेज आणि चमकदार ठेवा तुमच्या त्वचेला! title=

नवी दिल्ली : मेडिकल सर्व्हिसेस तसंच 'आर अॅन्ड बी'च्या उपाध्यक्ष तसंच काया स्किन क्लिनिकच्या प्रमुख डॉक्टर संगीता वेलासकर यांनी सध्याच्या उकडत्या वातावरणात आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी काही छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स दिल्यात.

  • तुमच्या त्वचेची हानिकारक सूर्यकिरणांपासून बचाव करेल अशा सनस्क्रीनची निवड करा. भारतीय त्वचेसाठी ३० एसपीएफ असणारं सनस्क्रीन उपयुक्त ठरतं. घरातून बाहेर निघताना २० ते ३० मिनिटे अगोदर सनस्क्रीन लावावं. 

  • डोळ्यांवर उन्हापासून संरक्षण करेल असा चष्माही लावावा. 

  • त्वचेला रोगमुक्त ठेवण्यासाठी दररोज दोन वेळा क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायजिंग करण्याची सवय लावा.

  • निश्तेज त्वचेपासून सुटका करून घेण्यासाठी स्क्रब करणं गरजेचं आहे. स्क्रबिंग केल्यानं मृत त्वचा तसंच जुन्या कोशिका निघतात. 

  • हातांचा कोपरा आणि गुडघ्यावरून मृत त्वचा हटवण्यासाठी एक दिवसाआड त्यावर साखरेसोबत लिंबूचा रस मिसळून त्यावर हलक्या हातांनी रगडा.

  • उन्हाळ्यात केसही कोरडे होतात. अशावेळी कोणत्याही प्रकारचे केमिकल आणि हेअरस्टाईल बनवणाऱ्या उपकरणांपासून थोडं लांबच राहा.

  • प्रत्येक दिवशी शॅम्पू केल्यानं केसांची चमक निघून जाते आणि केस कोरडे होतात. केसांसाठी नरम शॅम्पू आणि कंडीशरनरचाही वापर करा.

  • उन्हाळ्यात जेवढं जास्त पाणी पिता येईल तेवढं पिण्याचा प्रयत्न करा.... हलकं तसंच पोषक जेवणं घ्या. 

  • आपली त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी ताजी फळं आणि हिरव्या भाज्या खा. तुमच्या खाण्यात काकडी, कारलं, पालक, टरबूज, संत्र, चेरी, प्लम आणि लीची यांसारख्या भाज्या आणि फळांचा समावेश करा. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.