तुम्ही इंजेक्शन घेताय, तर सावधान ! एचआयव्हीचा धोका

Last Updated: Thursday, December 5, 2013 - 17:21

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारतात एचआयव्ही रूग्णांमध्ये घट झालेली असल्याचे एका अहवालावरून स्पष्ट झाले आहे. मात्र, नव्याने एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यात म्हटले आहे की, जे नशेच्या आहारी गेले आहेत. ते नशेसाठी अमली पदार्थ इंजेक्शनच्या माध्यमातून घेत आहेत. त्यांना सर्वाधिक धोका हा एचआयव्ही होण्याचा आहे.
इंजेक्शनच्या सहाय्याने अमली पदार्थाचे सेवन करणा-यांना एचआयव्ही म्हणजेच एड्स होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेने (नेको) दिलेली माहिती धक्कादायक आहे. भारतात सर्वसामान्य लोकसंख्येचा विचार करता एचआयव्ही होण्याचा प्रसार ०.४० टक्के आहे. मात्र, नशेसाठी इंजेक्शनचा वापर करणा-यांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण ७.१७ टक्के इतके आहे.
भारतात सर्वात जास्त अमली पदार्थ सेवन करणारे हे गरीब लोक आहे. त्यामुळे अमली पदार्थ सेवन करण्यासाठी इंजेक्शनचा वापर करतात. त्यामुळे एचआयव्ही संसर्ग पसरत आहे, अशी माहिती अभ्यासक जोसेफ यांनी म्हटले आहे. नेकोच्या नवीन आकडेवारीनुसार, भारतात तरुणांमध्ये अंदाजे एचआयव्ही संक्रमण दरवर्षी ५७ टक्क्यांनी कमी झाले. २०११ मध्ये एचआयव्हीची लागण झालेल्या लोकांची संख्या २०.८ दशलक्ष होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, December 5, 2013 - 17:21
comments powered by Disqus