आता भरपेट भात खाऊनही वजन कमी करा

भात खाण्याचे नाव घेतले की आपल्या डोक्यात पहिला विचार येतो तो म्हणजे आपले वजन वाढेल. 

Updated: Apr 27, 2017, 09:55 AM IST
आता भरपेट भात खाऊनही वजन कमी करा title=

मुंबई : भात खाण्याचे नाव घेतले की आपल्या डोक्यात पहिला विचार येतो तो म्हणजे आपले वजन वाढेल. 

यामुळेच भात कमी खाण्याकडे अनेकांचा कल असतो. तांदळात मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे, फायबर आणि व्हिटामिन बी असते त्यासोबत कार्बोहायड्रेटही असते. जे आपल्या शरीरासाठी गरजेचे असते. जाणून घ्या कोणत्या प्रकारचा भात तुमचे वजन वाढवणार नाही.

जर तुम्ही पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राईस खाता तर तुम्ही अधिक कॅलरी घेता. एक कप शिजलेल्या भातात २४२ कॅलरी, ४ ग्रॅम प्रोटीन आणि १ ग्रॅम फायबर असते. 

तर दुसरीकडे ब्राऊन राईसमध्ये कॅलरीची मात्रा २१८, प्रोटीन ५ ग्रॅम आणि ४ ग्रॅम फायबर असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी सफेद भातापेक्षा ब्राऊन राईस खाणे चांगले.