जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे योग्य...भात की पोळी?

हल्ली धकाधकीच्या जीवनशैलीमुळे वाढलेले आजार, ताणतणाव लक्षात घेता अनेकजण आपल्या आरोग्याबद्दल जागरुक झालेयत. काही लोक तर वेगळं काही खाण्याआधी शंभरदा विचार करतात खावे की नाही. 

Updated: Dec 24, 2016, 10:13 AM IST
जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे योग्य...भात की पोळी? title=

मुंबई : हल्ली धकाधकीच्या जीवनशैलीमुळे वाढलेले आजार, ताणतणाव लक्षात घेता अनेकजण आपल्या आरोग्याबद्दल जागरुक झालेयत. काही लोक तर वेगळं काही खाण्याआधी शंभरदा विचार करतात खावे की नाही. 

पूर्वीच्या काळी लोक असं सांगायचे की वाढत्या वयात भरपूर प्रमाणात पोळी, दूध, तुपाचे सेवन केल्यास म्हातारपणी कोणत्याही प्रकारचे आजार होत नाहीत. अनेकदा आपल्याला सांगितले जाते की भात खाण्यापेक्षा पोळी खावी. तर काही सांगतात की पोळीसोबत भात खाणेही गरजेचे असते. आपल्या आरोग्यासाठी भात खाणे चांगले की पोळी...घ्या जाणून...

१. डाएटिंग करणाऱ्यांसाठी - भातात मोठ्या प्रमाणात स्टार्चची मात्रा असते. ज्यामुळे भात खाल्ल्यानंतर तो लगेच पचतो. तसेच यात फॅट अधिक असते. तर दुसरीकडे पोळी लवकर पचत नाही. ज्यामुळे उशिरापर्यंत भूक लागत नाही. जर तुम्ही डाएटिंग करत असाल तर भात कमीच खा.

२. पचनशक्ती कमजोर असेल तर -  भातामध्ये कमी कार्बोहायड्रेट आणि कॅलरीची मात्रा योग्य असते. तसेच पोळीमध्ये कॅलरी आणि संयुक्त कार्बोहायड्रेट असते. त्यामुळे तुमची पाचनशक्ती कमजोर झाली असले तर अशावेळी भात खाणे उत्तम. 

३. पोषक तत्वे - पोळीच्या तुलनेत भातात फॉस्फर, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण कमी असते. भातात कॅल्शियम, सोडियम नसते. तसेच पोळीमध्ये भाताच्या तुलनेत जास्त फायबर, प्रोटीन, मायक्रोन्यूट्रीएंट्स आणि सोडियम असते.