संगीतात वेदना शमवण्याची ताकद

वेदनांपासून आराम हवाय? तर ऐका संगीत... छोट्यातल्या छोट्या वेदनेपासून आराम देण्याचं सामर्थ्य संगीतात असल्याचं नुकत्याच एका संशोधनातून स्पष्ट झालं आहे. संगीत ऐकल्यामुळे दहापैकी किमान चार लोकांना दीर्घकालीन वेदनेपासून आराम मिळत असल्याचं या संशोधनातून समोर आलं आहे.

जयवंत पाटील | Updated: Oct 26, 2013, 10:43 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
वेदनांपासून आराम हवाय? तर ऐका संगीत... छोट्यातल्या छोट्या वेदनेपासून आराम देण्याचं सामर्थ्य संगीतात असल्याचं नुकत्याच एका संशोधनातून स्पष्ट झालं आहे. संगीत ऐकल्यामुळे दहापैकी किमान चार लोकांना दीर्घकालीन वेदनेपासून आराम मिळत असल्याचं या संशोधनातून समोर आलं आहे.
लॉयडस फार्मेसी यांच्या द्वारे एक सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात एकूण १५०० लोकांचा सहभाग होता. यांत १६ ते २४ वयोगटातील ६६ टक्के लोकांनी असं कबूल केलं की, संगीत ऐकल्याने त्यांना वेदनेपासून मुक्ती मिळते. सहभागी लोकांमध्ये पॉप संगीत अधिक लोकप्रिय असल्याचं आढळून आलं. तसंच शास्त्रीय संगीतामुळे १७ टक्के आणि रॉक किंवा इंडी संगीतामुळे १६ टक्के लोकांना वेदनेपासून आराम मिळतो ही बाब सिद्ध झाली.
गाण्यांत इतकं सामर्थ्य असतं की, वेदनेतून सावरण्यास मदत होते. सिमोन आणि गारफंकेल यांच्या ‘ब्रिज ओवर ट्रबल्ड वॉटर’ हे गाणं ऐकल्यानंतर याची अनुभुती येते. तसचं रॉबी विलियम्स चे ‘एंजेल्स’, फ्लीटवुड मॅकचं गाणं ‘एल्बाट्रोस’, एल्टन जॉन चं ‘कैंडीस इन द विंड’ आणि कोमोडोर्स चं ‘ईजी’ या गीतांना मान्यता मिळाली आहे.
‘डेली मेल’च्या उटाह विश्वविद्यालयातील वेदना निवारण केंद्राचे डेविड ब्रॅडशा यांनी यावर अभ्यास केला. त्यांच्या मते, दु:खात आपण स्वत:ला कोणत्या न कोणत्या कामात व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वेदनेचा विसर पडण्यासाठी, मनपसंत संगीत ऐकणं हे सर्वोत्तम. कारणं यामुळे विचार आणि भावना जोडल्या जातात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.