वाचा: केस गळतीवर आयुर्वेदिक उपाय

Updated: Jul 1, 2016, 10:35 PM IST
वाचा: केस गळतीवर आयुर्वेदिक उपाय title=

नवी दिल्लीः केस गळणे या समस्येमुळं तुम्ही अस्वस्थ आहात का? काही केल्यानं केस गळती थांबत नाही. तर काळजी करू नका! यावर आयुर्वेदिक उपाय केल्यानंतर तुमची केस गळती नक्की थांबेल. जास्त पाणी प्यायल्यामुळं केस गळती रोखण्यासाठी मदत होते.

केस गळणे थांबविण्यासाठी प्राणायाम केल्यानं शरीरमधील रक्तस्त्राव वाढून केस मजबूत होतात. त्या व्यतिरिक्त 100 ग्राम मुलतानी मातीमध्ये 10 ग्राम सफेद चंदन पावडर हे एकत्र करून त्याची पेस्ट केसांवर लावल्यानं केस गळतीवर थांबते. जर तुमच्या केसात कोंडा असेल तर निंबाच्या पानांचा लेप करून केसांमध्ये लावल्यानं कोंडा कमी होण्यास मदत होते.  

शरीरातील कमी पोषक तत्त्वांमुळं केस गळतीसारख्या समस्येचा सामना करावा लागतो. 4-5 अंजीर, 10-15 मनुके, 2-4 बादाम एका ग्लासमध्ये रात्रभर भिजत ठेवावे. सकाळी त्याचं पाणी प्यायल्यानं आणि तो सुखा मेवा खाल्यानं शरीराला पोषण मिळतं. त्यामुळं केस गळती थांबण्यास मदत होते.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.