नाश्त्यामध्ये ब्रेड, कॉर्नफ्लेक्स खाणे शरीरासाठी हानिकारक

सकाळच्या नाश्त्यामध्ये अधिकजण ब्रेड, कॉर्नफ्लेक्स आणि अनेक तळलेले पदार्थ खाण्याची सवय असते. मात्र हे पदार्थ फुफ्फुसाच्या कॅन्सरला कारणीभूत ठरत असल्याचे नव्या संशोधनात समोर आलेय. व्हाईट ब्रेड, कॉर्नफ्लेक्सअसे ग्लायसेमिक इंडेक्सयुक्त पदार्थ खाल्ल्याने फुफ्फुसाचा कॅन्सर वाढण्याची शक्यता असते. 

Updated: Mar 15, 2016, 02:37 PM IST
नाश्त्यामध्ये ब्रेड, कॉर्नफ्लेक्स खाणे शरीरासाठी हानिकारक title=

नवी दिल्ली : सकाळच्या नाश्त्यामध्ये अधिकजण ब्रेड, कॉर्नफ्लेक्स आणि अनेक तळलेले पदार्थ खाण्याची सवय असते. मात्र हे पदार्थ फुफ्फुसाच्या कॅन्सरला कारणीभूत ठरत असल्याचे नव्या संशोधनात समोर आलेय. व्हाईट ब्रेड, कॉर्नफ्लेक्सअसे ग्लायसेमिक इंडेक्सयुक्त पदार्थ खाल्ल्याने फुफ्फुसाचा कॅन्सर वाढण्याची शक्यता असते. 

संशोधनादरम्यान ज्यांना हा आजार झाला होता अशा एक हजार ९०५ जणांना समाविष्ट केले होते. त्याचबरोबर दोन हजार ४१३ स्वस्थ व्यक्तींचेही निरीक्षण करण्यात आले. यादरम्यान त्यांच्या आहाराच्या सवयी जाणून घेतल्या. 

शोधकर्त्यांचे म्हणणे आहे की तंबाखू तसेच धूम्रपान न करणाऱ्या लोकांमध्येही फुफ्फुसाच्या कॅन्सरची लक्षणे आढळली. ज्यावरुन त्यांच्या आहाराच्या सवयी या कॅन्सरसाठी कारणीभूत असल्याची शक्यता आहे.