डायबिटीस असणाऱ्यांसाठी 'गोड' बातमी

डायबिटीस असणाऱ्यांसाठी एक गोड बातमी आहे.

Updated: May 21, 2016, 09:48 PM IST
डायबिटीस असणाऱ्यांसाठी 'गोड' बातमी title=

लखनऊ: डायबिटीस असणाऱ्यांसाठी एक गोड बातमी आहे. डायबिटीसवर गुणकारी ठरणा-या आयुर्वेदिक औषधाची निर्मिती करण्यात आली आहे. 'बी जी आर - ३४' म्हणजेच ब्लड ग्लुकोज रेगुलेटर असं या आयुर्वेदिक औषधाचं नाव आहे. 

विशेष म्हणजे ५ रुपयांना एक गोळी या किमतीमध्ये हे औषध उपलब्ध होणार आहे. टाईप दोन प्रकारच्या डायबिटीससाठी हे औषध उपयुक्त ठरणार आहे. केंद्र सरकारच्या संशोधन प्रकल्पाचा भाग असलेल्या काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च संस्थेनं या औषधाची निर्मिती केली आहे. 

लखनऊमधल्या नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट तसंच सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड ऍरोमॅटिक प्लांट्स या संस्थांचं सहाय्य, बी जी आर - ३४ औषधाच्या निर्मितीमध्ये लाभलं आहे.