... ही लस ठरू शकते `एडस`साठी मारक!

एडसवर उपाय म्हणून शोधण्यात आलेली एक लस एचआयव्हीला पूर्णत: नष्ट करण्यात यशस्वी ठरलीय. एका नव्या संशोधनात या लसीसंदर्भात हा दावा करण्यात आला आहे.

www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
एडसवर उपाय म्हणून शोधण्यात आलेली एक लस एचआयव्हीला पूर्णत: नष्ट करण्यात यशस्वी ठरलीय. एका नव्या संशोधनात या लसीसंदर्भात हा दावा करण्यात आला आहे.
`ओरेझोन हेल्थ अॅन्ड सायन्स युनिव्हर्सिटी`मध्ये ही लस विकसीत करण्यात आलीय. एचआयव्ही एडसवर उपाय म्हणून शोधण्यात आलेल्या या लसीमध्ये एडस् पसरवणाऱ्या व्हायरसला निकामी करण्याची क्षमता आहे, असा दावा शोधकर्त्यांनी केलाय.
मनुष्यामध्ये आढळणाऱ्या एचआयव्हीप्रमाणेच इतर एसआयव्ही व्हायरसवरदेखील ही लस उपाय ठरू शकते का? याविष्यी परिक्षण सुरू आहे. एसआव्ही हा माकडांमध्ये एडस् पसरवतो. लवकरच हा प्रयोग मनुष्यावरही करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला जातोय.
ओएचएसयू वॅक्सीन अॅन्ड जीन थेरेपी इन्सिट्यूटचे सहाय्यक संचालक लुईस पिकर यांच्या म्हणण्यानुसार, अजूनपर्यंत एचआयव्ही संक्रमणावर इलाज खूप कमी केसेसवर होऊ शकलाय. ज्यामध्ये एचआयव्ही संक्रमित व्यक्तीला अॅन्टी व्हायरल औषधं संक्रमणानंतर काही वेळेतच दिली गेली किंवा ज्यांनी कँन्सरवर नियंत्रण मिळवण्यासाठी सेल ट्रान्सप्लान्ट केलं. या नव्या शोधामुळे अशी आशा निर्माण झालीय की या लसीमुळे प्रतिरोधक क्षमतेच्या प्रक्रियेत शरीरात एचआयव्हीला मुळापासून नष्ट करण्याची क्षमता असू शकते.

आपल्या संशोधनासाठी पिकर यांनी सायटोगेलोवायरस किंवा सीएमव्ही यांचा वापर केला. हा व्हायरस मोठ्या प्रमाणात आढळून येतो. सीएमव्ही आणि एसआयव्ही यांचा एकमेकांशी संबंध एक वेगळाच प्रभाव ठरतो, असं शोधकर्त्यांच्या लक्षात आलंय. ‘इफैक्ट मेमोरी’चे टी सेल एसआयव्ही संक्रमित पेशींना शोधून काढून त्यांना नष्ट करण्यात यशस्वी ठरतोय. हे संशोधन ‘नेचर’ या पत्रिकेत प्रकाशित करण्यात आलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.