चिकनमुळे अॅन्टीबायोटिक्स औषधांचा प्रभाव नाही

चिकन खाणे तुमच्या स्वास्थ्यासाठी हाणीकारक ठरु शकते.  डॉक्टर जे अॅन्टीबायोटिक्स देतात त्यांचा परिणाम मानवी शरिरावर होत नाही, याचे एक कारण चिकनचे सेवनही असू शकते ,असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

Updated: Jul 27, 2015, 02:37 PM IST
चिकनमुळे अॅन्टीबायोटिक्स औषधांचा प्रभाव नाही title=

नवी दिल्ली : चिकन खाणे तुमच्या स्वास्थ्यासाठी हाणीकारक ठरु शकते.  डॉक्टर जे अॅन्टीबायोटिक्स देतात त्यांचा परिणाम मानवी शरिरावर होत नाही, याचे एक कारण चिकनचे सेवनही असू शकते ,असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

या सर्वेक्षणानुसार चिकन खाणाऱ्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. दिल्लीतील एनसीआरच्या सर्वेनुसार कोंबडीच्या पिल्लांना अॅन्टीबायोटिक्स खायला देऊन त्यांचे वजन वाढवले जाते.

यामुळे चिकन खाणाऱ्यावर अॅन्टीबायोटिक्सची औषधांचा अजिबात प्रभाव करत नाही, कारण नमुनामध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये ४० टक्के अॅन्टीबायोटिक्स तर पिल्लांच्या शरिरातचं आढळतात. 

या अवस्थेत ही औषधे मानवी शरिरावर काहीचं प्रभाव दाखवू शकत नाही, यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते.

सेंटर ऑफ सायन्स अॅऩ्ड एनव्हॉरमेंट (सीएसई)ने या सर्वेक्षणासाठी, दिल्लीतील अनेक शहरातून चिकनचे नमुने घेतले होते. यातील ४० टक्के नमुन्यांमध्ये अॅन्टीबायोटिक्सचे प्रमाण आढळले गेले.

१७  टक्के नमुन्यात एकापेक्षा अधिक अॅन्टीबायोटिक्स आढळले. माणसांसाठी धोकादायक असलेल्या या समस्येतून मार्ग काढायला सरकारने पाऊल उचलणे गरजेचे आहे असे सीएसईने म्हटले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.