जगातील ३० कोटी लोक आहेत नैराश्यग्रस्त

जीवनात माणासाला यशासह अपयशही पाहावे लागते. मात्र जीवनातील अपयशांचे ओझे माणसाने पेलावयास शिकायलाच हवे. नाहीतर त्यातून नैराश्य येते. 

Updated: Apr 1, 2017, 12:13 PM IST
जगातील ३० कोटी लोक आहेत नैराश्यग्रस्त title=

नवी दिल्ली : जीवनात माणासाला यशासह अपयशही पाहावे लागते. मात्र जीवनातील अपयशांचे ओझे माणसाने पेलावयास शिकायलाच हवे. नाहीतर त्यातून नैराश्य येते. 

वर्ल्ड हेल्थ ऑगर्नायझेशनने नुकत्याच दिलेल्या अहवालानुसार जगातील तब्बल ३० कोटीहून अधिक व्यक्ती नैराश्याने ग्रस्त आहे. हा आकडा पाहिला असता जगभरातील सर्वच देशांसाठी ही धोक्याची घंटा की या देशांनी मानसिक आरोग्याबाबत पुन्हा एकदा विचार केला पाहिजे. 

डब्लूएचओच्या मते २००५ ते २०१५ या कालावधीत नैराश्यग्रस्त लोकांच्या संख्येत तब्बल १८ टक्क्यांनी वाढ दिलीये. रिपोर्टनुसार, नैराश्य आत्महत्या करण्यास कारणीभूत ठरणारे कारण आहे. देशात याच कारणामुळे मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात. त्यामुळे हा आकडा कमी कसा करता येईल याचा विचार जगभरातील देशांनी करायलाच हवा.