तुम्ही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करत असाल तर सावधान!

तुम्ही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करत असाल तर तुम्ही दिवसेंदिवस बुद्धू बनत चाललात. नुकत्याच जाहीर झालेल्या एका अभ्यासात असंच काहीसं म्हटलं गेलंय.

Updated: Nov 4, 2014, 07:13 PM IST
तुम्ही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करत असाल तर सावधान! title=

मुंबई : तुम्ही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करत असाल तर तुम्ही दिवसेंदिवस बुद्धू बनत चाललात. नुकत्याच जाहीर झालेल्या एका अभ्यासात असंच काहीसं म्हटलं गेलंय.

दीर्घकाळापर्यंत अनियमित शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांच्या स्मरणशक्ती आणि मानसिक क्षमतांना मोठ नुकसान होतं. ज्या लोकांच्या शिफ्टस मॉर्निंग, आफ्टरनून आणि नाईटमध्ये रोटेट होत असतात, त्यांची विचार करण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होत जाते.

शिफ्टमध्ये काम केल्यानं शरीराचं इंटरनल क्लॉक म्हणजेच वेळेचा अंदाज लावण्याचं सिस्टमच बिघडतो. यामुळेच, व्यक्तीला कॅन्सर किंवा हृयाच्या इतर आजारांना सामोरं जावं लागतं. सलग वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या शिफ्टला काम करणाऱ्यांवर याचा जास्त परिणाम होतो.

फ्रान्समध्ये राहणाऱ्या तीन हजार लोकांवर केल्या गेलेल्या या अभ्यासात ही गोष्ट समोर आलीय. एकाच शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांहून वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.