सौंदर्य खुलविण्यासाठीच्या सोप्या आणि घरेलू टिप्स...

फळं खाणं आरोग्यासाठी बेस्टच. ऋतुमानानुसार बाजारात येणारी फळं फक्त उत्तम आरोग्यच नव्हे तर सौंदर्यवर्धकही आहेत . तसंच ही फळं तुमचं सौंदर्य फुलवण्यास मदत करतात. फळं जसे आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जातात. तसंच ते सौंदर्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे.

Updated: Dec 28, 2013, 04:32 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
फळं खाणं आरोग्यासाठी बेस्टच. ऋतुमानानुसार बाजारात येणारी फळं फक्त उत्तम आरोग्यच नव्हे तर सौंदर्यवर्धकही आहेत . तसंच ही फळं तुमचं सौंदर्य फुलवण्यास मदत करतात. फळं जसे आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जातात. तसंच ते सौंदर्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे.
 कैरी : हल्ली कैर्याय बाजारात दिसायला लागल्यात आता त्या थोड्या महाग असल्या तरी त्या तुमची त्वचा मुलायम आणि कांतिमान बनवण्यास मदत करणार्या् आहेत. एक कैरी उकळवून त्याचा गर चेहरा, गळा, मानेवर चोळा आणि वाळल्यावर धुवा.
 संत्री : संत्र्याची साल उन्हात वाळवून वस्त्रगाळ पूड करून ती दुधात कालवा हे मिश्रण चेहर्यागवर लावा तेलकट त्वचेस याचा फायदा होईल चेहर्यादचा रंग उजळण्यास मदत होईल.
 काकडी : त्वचा ब्लीच करण्यासाठी याचा रस चेहर्यारस चोळावा किंवा चेहर्याेवर फोडी ठेवा पंधरा मिनिटांनी चेहरा धुवा.
 डाळिंब : पिकलेल्या डाळिंबाचे दाणे चेहऱ्यावर दररोज चोळा त्वचेचा रंग हलका आणि गुलाबी होण्यास मदत होईल ओठांवरुनही त्याचा रस फिरवा, ओठांचा रंग सुधारेल चेहर्याववरील डाग घालवण्यासाठी डाळिंबाची साल कच्च्या दुधात वाटा आणि ती पेस्ट चेहरा, मानेवर लावा सुकल्यावर धुवा.
 पपई : फार पूर्वीपासून पपईचा गर उपयुक्त सौंदर्य प्रसाधन म्हणून वापरात आहे पपईचा गर चेहर्याचवर चोळल्यास डाग, पुरळ कमी होण्यास मदत होते त्वचेचं आरोग्य सुधारतं.
 नारळपाणी : नारळपाणी नियमितपणे चेहर्यायवर लावा त्यानं चेहर्याावरील डाग, राप निघून जाण्यास मदत होते.
 केळी : पिकलेल्या केळ्याचा गर आणि मलईचा पॅक चेहर्याववर लावा पंधरा मिनिटांनी चेहरा धुवा त्यानंतर आधीच मधात बुडवलेल्या पिकलेल्या केळ्याच्या पातळ चकत्या चेहर्याॅवर लावा १५ मिनिटांनी चेहरा धुवा त्वचेचा कोरडेपणा जाऊन तिचं आरोग्य सुधारतं चेहर्या वर पुटकुळ्या असतील तर केळ्याचा गर चोळून तो अर्धा तास ठेवा कच्च्या दुधानं चेहरा धुवा.
 सफरचंद : सफरचंदाच्या रसात थोडे गुलाबजलाचे थेंब घालून चेहर्याूवर लावा किंवा सफरचंदाचा गर उकडवून तो लावा वाळला की चेहरा धुवा सावळा रंग उजळण्यास मदत होईल.
 खरबूज : शुष्क त्वचेसाठी खरबूजाच्या गरात एक अंड्याचा पांढरा भाग आणि थोडी मिल्क पावडर घाला आणि हे मिश्रण चेहर्याूला लावा त्वचा राठ असल्यास खरबुजाचा गर लावा

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.