उन्हाच्या त्रासापासून वाचण्याचे आठ उपाय...

वाढत्या उन्हाचा त्रास सगळ्यांनाच होत आहे. यापासून रक्षण करण्यासाठी शूज, हात-पाय मोजे, गॉगल, छत्री, स्कार्प, सनस्क्रीन लोशन याचा वापर केला जात आहे. परंतु याबरोबरच काही घटकांचाही आहारात समावेश करणे आवश्यक आहे. यामुळे तुम्ही निरोगी राहू शकाल. या काही टिप्स तुम्हाला उन्हाळ्यातही ठेवतील फिट

Updated: May 3, 2016, 05:07 PM IST
उन्हाच्या त्रासापासून वाचण्याचे आठ उपाय... title=

मुंबई : वाढत्या उन्हाचा त्रास सगळ्यांनाच होत आहे. यापासून रक्षण करण्यासाठी शूज, हात-पाय मोजे, गॉगल, छत्री, स्कार्प, सनस्क्रीन लोशन याचा वापर केला जात आहे. परंतु याबरोबरच काही घटकांचाही आहारात समावेश करणे आवश्यक आहे. यामुळे तुम्ही निरोगी राहू शकाल. या काही टिप्स तुम्हाला उन्हाळ्यातही ठेवतील फिट

१) पाणी-  सकाळी उठल्यानंतर भरपूर पाणी पिणे. यामुळे बॉडी डिटॉक्स होते आणि पचनक्रियाही चांगली होते. 

२) झोप - रोज सहा ते आठ तास झोप घ्या. यामुळे तुम्ही निरोगी आणि फ्रेश राहाल.

३) मीठ - पौष्टिक ब्रेकफास्टने सकाळची सुरुवात करा, परंतु यात मिठाचे सेवन कमी करण्याचा प्रयत्न करा. सकाळी मीठ कमी खाल्ल्यास चरबी कमी होते.

४) भाज्या आणि फळं- यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती चांगली राहते. तसेच पचक्रियाही सुरळीत होते.

५) व्यायाम - सकाळ-सकाळी व्यायाम केल्याने रक्ताभिसरण व्यवस्थित होते. तसेच जास्त असलेली चरबी कमी करण्यास मदत होते.

६) ब्रेकफास्ट - सकाळचा ब्रेकफास्ट कधीही टाळू नका. तुम्ही जर दिवसाची सुरुवात पौष्टिक ब्रेकफास्टने करत असाल तर दिवसभर तुम्ही फ्रेश राहून काम करू शकाल. 

७) पायऱ्या - लिफ्टचा वापर न करता पायऱ्यांचा वापर करा. यामुळे ऊर्जा खर्च होऊन तुमच्या शरीरावर चरबी सुटणार नाही.

८) कांदा - उन्हात फिरत असताना जवळ कांदा ठेवावा. कांदा तुमच्या शरिरापर्यंत उन्हाची झळ येऊ देत नाही. विशेषतः पांढरा कांदा ठेवल्यास तो संध्याकाळपर्यंत पिवळसर पडतो. त्याने तुम्हांला उन्हाचा त्रास होत नाही.