उन्हाळ्यात कसे जपाल आरोग्य?

Last Updated: Sunday, May 5, 2013 - 09:38

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
उकाड्याने हैराण झालात. उन्हाळा म्हणजे उकाडा, घाम, चिकटपणा आणि त्यासोबत येणारे वेगवेगळे आजार. असं काहीसं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. त्यामुळे अनेकांना उन्हाळा नकोसा होतो. अशावेळी उष्णतेच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. तुम्ही आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्याल.
उन्हाळ्यात शिळे अन्न तसेच रस्त्यावरील पदार्थ खल्ल्याने फुड पॉयझिनग अर्थात अन्नातील विषबाधा होते. तसेच अतिनील किरणांमुळे त्वचाकर्करोगाचा सामना करावा लागतो. त्वचाकर्कराग हा उन्हाळ्याचाच रोग आहे. पण इतरही अनेक आजार उन्हाळ्यात डोकं वर काढत असतात. त्यामुळे आपण काळजी घेतलेली बरी.

उन्हाळ्यात सर्वात जास्त त्रस्त करणारा आजार म्हणजे गॅस्ट्रोएन्ट्रायटिस हा होय. उन्हाळ्यामध्ये याच आजाराचे रुग्ण अधिक आढळतात. अनेक व्यक्ती पोटाच्या त्रासामुळे त्रस्त असतात. यालाच ‘स्टमक फ्लू’ असंही म्हणतात. नोरोव्हायरस, रोटाव्हायरस आणि एस्ट्रोव्हायरस यांसारख्या जीवाणूंमुळे हा आजार पसरतो. दुषित पाणी आणि अन्नातून हे जीवाणू आपल्या शरीरापर्यंत पोहोचतात आणि ४८ तासांत संक्रमण पसरवतात. यामुळे आतडयांमध्ये संक्रमण झाल्यास डायरियासारखे आजार उत्पन्न होतात. पाईल्स, फिशर आणि बद्धकोष्टता यांसारखे आजारदेखील होतात.
हा आजार होतो कसा? त्याचेप्रमुख कारण म्हणजे पाण्याची कमतरता. प्रदूषित अन्न आणि दूषित पाणी होय. पाणी मिळाले नाही तर कोल्ड्रिंक रिचवलं, यामुळेच हा आजार निर्माण होतो. त्यामुळे पाणी पिताना काळजी घेतली पाहिजे. हा आजार बळावल्यास पोट खराब होण्याची लक्षणं यामध्ये दिसू लागतात. म्हणजे पोटात गुडगुडणं, अस्वस्थपणा जाणवणं. काहीवेळी उलट्याही होतात. ताप आणि अशक्तपणा जाणवतो. घसा कोरडा पडतो. तर अशक्तपणा जाणवतो.

उन्हाळ्यातील आजार टाळण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. गाड्यांवरील उघडे अन्नपदार्थ खाऊ नयेत. पाण्यासोबतच पातळ पदार्थाचं सेवन वाढवावं. स्वच्छ पाणी प्यावं. ताक, लिंबू, सरबत प्यावं. जड आणि तिखट मसालेदार तळलेले पदार्थ खाऊ नयेत. सहज पचणारं हलकं भोजन घ्यावं. साखर मीठाचं पाणी प्यावं, खाण्यापूर्वी हात स्वच्छ करावेत. उन्हाळ्यात ताप किंवा डोके दुखत असल्यास पॅरॅसिटामोल किंवा क्रोसिनसारखी औषधं स्वत:हूनच घेऊ नये. डॉक्टरांच्या सल्लाने अॅंण्टीबायोटीक औषधे घेणे केव्हाही चांगले. ताप अधिक असल्यास कपाळावर पाण्याच्या पट्टय़ा ठेवल्यास आराम मिळतो. क जीवनसत्त्व, अॅीण्टिऑक्सिडंट, ए, सी, बी यांचं प्रमाण वाढवावं. यामुळे प्रतिकार क्षमता वाढते.

अस्वस्थपणासोबत अधिक ताप येणं आणि त्यासोबत युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होणं हे आजार उन्हाळ्यात सर्वसामान्य आहेत. उन्हाळ्यामुळे डिहायड्रेशन झाल्यास जीवाणू मूत्राशयामध्ये प्रवेश करतात. हा आजार स्त्रियांमध्ये अधिक दिसतो. यामध्ये तीव्र ताप, थंडी, ब्लॅडरच्या आजूबाजूला वेदना, वारंवार लघवी होणं आणि त्याभागात जळजळ होणं अशी लक्षणे दिसतात. जास्त संक्रमण झाल्यास झोप लागत नाही. पाणी, पातळ पदार्थ घेण्याबरोबरच हा त्रास होऊ नये म्हणून स्वच्छता आणि साफसफाईकडे विशेष लक्ष द्यावं. सार्वजनिक स्वच्छतागृहे वापरू नयेत.
अर्धशिशी (मायग्रेन) यामध्ये अर्ध डोकं दुखतं. काही वेळा वेदना वाढल्यानंतर उलटया सुरू होतात. हा त्रास होऊ नये म्हणून तीव्र प्रकाशाच्या जागेपासून दूर रहावं. खोलीला गडद जाड पडदे लावावे. यामुळे शांत वातावरणात गारवाही जाणवतो. बाहेर जाताना गॉगल किंवा छत्री जरूर घ्यावी. डॉक्टरांचा सल्ला वेळीच घ्यावा.
उन्हाळ्यात घाम जास्त येत असल्यामुळे पाण्याची कमतरता होऊन धोका वाढू शकतो. यासाठीच पाण्याची मात्रा वाढवावी. गरज असेल तरच उन्हात बाहेर जावे अन्यथा सावलीतच रहावे. जायचं असल्यास पोट रिकामं नसावं, पाणी जवळ असावं. तसंच उन्हापासून बचाव करणारी सर्व साधनं सोबत असावीत. लहान मुले आणि वृद्धांसाठी हा ऋतू विशेष देखभालीचा आहे. दोघांची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत असल्यामुळे कुठल्याही रोगाचा हल्ला यांच्यावर चटकन परिणाम करतो. खाण्यापिण्यापासून फिरण्यापर्यंत सावधगिरी बाळगावी. पाणी जास्त प्यावं आणि साधं जेवण करावं.
उन्हाळ्याच्या काळामध्ये दिवसातून कमीतकमी १२ ग्लास पाणी अवश्य प्यावं. यासोबतच पातळ पदार्थाचं प्रमाणही अधिक करावां. यामध्ये कोल्ड्रिंकऐवजी ताज्या फळांचा रस, नारळपाणी, लिंबूपाणी, ताक इत्यादी प्यावे. यामुळे शरीरात स्फूर्ती येते आणि भरपूर ऊर्जाही

First Published: Sunday, May 5, 2013 - 09:38
comments powered by Disqus