२८ टक्के भारतीय आपल्या लग्नाला कंटाळलेत - सर्व्हे

भारतात लग्न म्हणजे जन्मोजन्मीचं बंधन मानलं जातं. पुढची सात वर्ष एकाच व्यक्तीसोबत व्यतीत करण्याच्या आणाभाकाही लग्नात घेतल्या जातात... पण, याच जन्मात अनेक भारतीय आपल्या लग्नाच्या बंधनाला कंटाळल्याचं समोर आलंय. 

Updated: Feb 3, 2016, 01:35 PM IST
२८ टक्के भारतीय आपल्या लग्नाला कंटाळलेत - सर्व्हे title=

नवी दिल्ली : भारतात लग्न म्हणजे जन्मोजन्मीचं बंधन मानलं जातं. पुढची सात वर्ष एकाच व्यक्तीसोबत व्यतीत करण्याच्या आणाभाकाही लग्नात घेतल्या जातात... पण, याच जन्मात अनेक भारतीय आपल्या लग्नाच्या बंधनाला कंटाळल्याचं समोर आलंय. 

होय, एका सर्व्हेनुसार जवळपास २८ टक्के भारतीय आपल्या लग्नाला उबलेत... कंटाळलेत. एका इंग्रजी वेबसाईटनं एका रिसर्चचा दाखला देत भारतातील लोकांचा सेक्स बाबतीत आकर्षण कमी होत असल्याचं म्हटलंय. 

पूर्वीपेक्षा आता मात्र आठवड्यात केवळ अर्धा तास लोक लैंगिक संबंधांसाठी देतात. सर्व्हेमध्ये सहभागी होणारे १६.६ टक्के लोक आपल्या वैवाहिक सेक्स लाईफ संबंध असंतुष्ट होते. 

सर्व्हेमध्ये सहभागी होणाऱ्या अधिकांश लोकांनी हे मान्य केलंय की लग्नानंतर काही वर्षांपर्यंत त्यांचे आपल्या पार्टनरसोबत संबंध चांगले होते... परंतु, हळू हळू ते एकमेकांपासून दूर होऊ लागले. आता ते आपल्या लग्नाला खुपसे कंटाळले आहेत, असंही बऱ्याच जणांनी मान्य केलंय.