पाहा... उन्हाळ्यात कशी घ्याल आरोग्याची काळजी!

सध्या मुंबईचा पारा चांगलाच तापलाय.मुंबईकरांच्या अंगाची अक्षरक्ष: लाही लाही होतेय. त्यामुळेच या वाढत्या तापमानात आरोग्याची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे.

Updated: Mar 27, 2015, 10:59 PM IST
पाहा... उन्हाळ्यात कशी घ्याल आरोग्याची काळजी! title=

मुंबई : सध्या मुंबईचा पारा चांगलाच तापलाय.मुंबईकरांच्या अंगाची अक्षरक्ष: लाही लाही होतेय. त्यामुळेच या वाढत्या तापमानात आरोग्याची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे.

मुंबईत बुधवारी अचानक चाळीशी पार गेलेला पारा सध्या घसरलाय. असं असलं तरी हवेमध्ये बाष्प असल्यामुळे मुंबईकराना प्रचंड उकाड्याला सामोरं जावं लागतंय. येत्या काही दिवस हे तापमान असंच स्थिर राहील असा अनुमान कुलाबा वेध शाळेचे संचालक व्ही. के. राजीव यांनी वर्तवलाय.

उन्हाळ्यात सर्वांत जास्त त्रस्त करणारा आजार म्हणजे 'गॅस्ट्रोएन्ट्रायटिस'... उन्हाळ्यामध्ये याच आजाराचे रुग्ण अधिक आढळतात. अनेक व्यक्ती पोटाच्या त्रासामुळे त्रस्त असतात. यालाच ‘स्टमक फ्लू’ असंही म्हणतात. नोरोव्हायरस, रोटाव्हायरस आणि एस्ट्रोव्हायरस यांसारख्या जीवाणूंमुळे हा आजार पसरतो. तसेच यूरिनरी इन्फेक्शनही अनेकांना होतं. दूषित पाणी आणि अन्नातून हे जीवाणू पसरतात.

उन्हाळ्यातील आजार टाळण्यासाठी काय खबरदारी घ्याल?

  • गाड्यांवरील उघडे अन्नपदार्थ खाऊ नयेत.

  • पाण्यासोबतच पातळ पदार्थाचं सेवन वाढवावं.

  • स्वच्छ पाणी प्यावं. ताक, लिंबू, सरबत प्यावं.

  • जड आणि तिखट मसालेदार तळलेले पदार्थ खाऊ नयेत.

  • सहज पचणारं हलकं भोजन घ्यावं.

  • साखर मीठाचं पाणी प्यावं, खाण्यापूर्वी हात स्वच्छ करावेत.

  • उन्हाळ्यात ताप किंवा डोके दुखत असल्यास औषधं स्वत:हूनच घेऊ नये..

  • शरीरात क जीवनसत्त्व, अॅीण्टिऑक्सिडंट, ए, सी, बी यांचं प्रमाण वाढवावं. यामुळे प्रतिकार क्षमता वाढते.

  • लहान मुले आणि वृद्धांसाठी उन्हाळायत विशेष देख भाल गरजेची आहे. दोघांची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत असल्यामुळे कुठल्याही रोगाचा हल्ला यांच्यावर चटकन परिणाम करतो. खाण्यापिण्यापासून फिरण्यापर्यंत सावधगिरी बाळगावी.

  • उन्हामध्ये फिरणं टाळावं आणि कामानिमित बाहेर पडायचं असल्यास उन्हापासून संरक्षण होईल, अशी साधनं सोबत असतील याची काळजी घ्या.

त्यामुळे मार्च अखेरीस सुरु झालेला हा उन्हाचा पारा संबंध उन्हाळा भर आपल्याला त्रास दायक ठरू नए असं वाटत असेल तर आता पासूनच सज्ज होत आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास सुरवात करा. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.