चहा चालेल पण, कॉफी... ना बाबा ना!

जर तुम्हाला चहा आणि कॉफी यामध्ये एकाची निवड करायचीय तर चहा पिणं तुमच्या आरोग्यासाठी जास्त लाभदायक ठरतं... चमकलात ना! पण, एका शोधामध्ये हे समोर आलंय. 

Updated: Sep 3, 2014, 08:13 AM IST
चहा चालेल पण, कॉफी... ना बाबा ना! title=

लंडन : जर तुम्हाला चहा आणि कॉफी यामध्ये एकाची निवड करायचीय तर चहा पिणं तुमच्या आरोग्यासाठी जास्त लाभदायक ठरतं... चमकलात ना! पण, एका शोधामध्ये हे समोर आलंय. 

कॉफीमध्ये ऑक्सीकरणविरोधी (अँन्टीऑक्सीडेन्ट) गुण असतात. एका शोधानुसार, चहा पिल्यानं ‘नॉन कार्डिओ वस्कुलर सीव्ही’चा धोका जवळपास 24 टक्क्यांनी कमी होतो. 

स्पेनच्या बार्सिलोनामध्ये युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी (ईएससी) काँग्रेस 2014 मध्ये फ्रान्सचे प्रोफेसर निकोलस डानचिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉफी आणि चहा आपल्या जीवनातील महत्त्वपूर्ण अंश आहेत. आम्ही फ्रान्सच्या ‘नॉन कार्डिओ’ आजारांचा धोका असणाऱ्या लोकांमध्ये सीव्ही धोका आणि गैर सीव्ही धोक्यावर चहा आणि कॉफीचे परिणाम पडताळून पाहिले. 

शोधात 18 ते 95 वयांच्या 1,31,401 लोक सहभागी झाले होते. जवळपास 3.5 वर्षांच्या फॉलोअप कालावधीत सीव्ही कारणांनी 95 आणि गैर सीव्ही कारणांनी 632 लोकांचा मृत्यू झाला. तर, कॉफी पिणाऱ्या लोकांमध्ये सीव्हीचा धोका, कॉफी न पिणाऱ्या लोकांच्या मानानं कित्येक पटीनं अधिक होता. कॉफी न पिणारे लोक शारीरिक रुपात जास्त सक्रीय होते. कॉफी न पिण्यानं शारीरिक सक्रीयतेचा स्तर 45 टक्के तर कॉफी पिणाऱ्यांमध्ये 41 टक्के होता.

पण, चहा पिणाऱ्या लोकांमध्ये सीव्हीचा धोका खूप कमी होता. नियमित चहा पिणाऱ्यांमध्ये शारीरिक हाचलाची 43 टक्के तर जास्त चहा पिणाऱ्या लोकांमध्ये शारीरिक हालचाली 46 टक्क्यांपर्यंत वाढलेल्या आढळल्या.

थोडक्यात सांगायचं तर, कॉफी पिणाऱ्यांमध्ये धोक्याचा स्तर अधिक आणि चहा पिणाऱ्यांमध्ये हाच धोका कमी होता. इतकंच नाही, तर यामध्ये असंही आढळलं की महिलांच्या प्रमाणात पुरुण जास्त कॉफी पितात तर महिला त्याच तुलनेत जास्त चहा पिताना आढळतात.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.