तुमचे केस गळत आहेत...तर हे कराच!

कधी कधी केस गळणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, दररोज खूप केस गळत असतील तर ती चिंताजनक बाब आहे. जर विचार करा, दर दिवशी केस गळत असतील तर आपल्या डोक्यावर केसच दिसणार नाही. परंतु घाबरून जाऊ नका. ही खरी गोष्ट आहे, केस गळणे हे धोकादायक आहे. यावर लक्ष केंद्रीत केले तर तुमचे केस गळणार नाही. त्यासाठी एक रामबाण औषध आहे. ते म्हणजे कांद्याचा रस.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 4, 2014, 03:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कधी कधी केस गळणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, दररोज खूप केस गळत असतील तर ती चिंताजनक बाब आहे. जर विचार करा, दर दिवशी केस गळत असतील तर आपल्या डोक्यावर केसच दिसणार नाही. परंतु घाबरून जाऊ नका. ही खरी गोष्ट आहे, केस गळणे हे धोकादायक आहे. यावर लक्ष केंद्रीत केले तर तुमचे केस गळणार नाही. त्यासाठी एक रामबाण औषध आहे. ते म्हणजे कांद्याचा रस.

कांदा हा केस गळती रोखतो. कारण कांद्यामध्ये सल्फर मात्रा अधिक असते. कांद्याचा रस काढून तो केसांना लावल्यास सल्फरमुळे रक्त संचार चांगला होतो. त्यामुळे कांद्याचा रस हा स्कल्प इंफेक्शन नष्ट करतो. आणि त्याचबरोबर केसांना मजबूत बनण्यास मदत करतो.

कसा उपयोग करणार
- कांद्याला मिक्सरमध्ये थोडेसे पाणी घेऊन वाटावा. त्यानंतर कांद्याचा रस काढून घ्यावा. हा रस्त केसांना लावावा. तीन मिनिट हा रस ठेवू द्यावा. त्यानंतर चांगल्या शॅम्पूने केस धुवून टाकावेत. कांद्याचा रस आठवड्यातून तीनवेळा लावणे आवश्यक आहे.

- कांद्याच्या रसाबरोबर मध लावलेली चांगली. एक चतुर्थ कप रसात थोडीशी मध मिसळायची. हे मिश्रण केसांच्या मुळाशी लावायचे. त्यामुळे केस गळण्याची समस्या दूर होईल.
- एक कांदा कापून रम भरलेल्या ग्लासात टाकावा. कांदा एक रात्र तसचा ठेवावा. दुसऱ्या दिवशी रम काढून घ्यावी. त्यानंतर कांद्याचे तुकडे वेगळे होतील. या रमने केसांचा मसाज करावा. आठवड्यातून दोनवेळा हा प्रयोग करावा. केस गळायचे थांबतील.
- एक चमच्या मद आणि एक चमच्या दालचिन पावडरमध्ये थोडे ऑलिव तेल घेऊन त्याची पेस्ट करावी. आंघोळ करण्यापूर्वी केस धुण्याआधी ही पेस्ट केसांना लावायची. १५ मिनिटानंतर गरम पाण्याने केस धुवावे. असं केल्यानंतर काही दिवसांनी केस गळण्याची समस्या दूर होईल.
- आकाशवेल (अमरवेल) पाण्यात उकळवा. या पाण्याने केस धुतल्याने केस गळण्याचे थांबतात.

केस गळण्यासाठी हे टाळा
- तुमचे जास्त केस गळत असतील तर तुम्ही चहा आणि कॉफी घेण्याचे टाळा. तसेच नशायुक्त पदार्थांचे सेवन करू नका. धुम्रपान करण्याचे टाळा. त्यामुळे केस गळण्याचे तात्काळ बंद होईल. जास्तीत जास्त पाणी प्या.
- मोहरीचे तेल मेहंदीच्या पानावर टाकून पाने गरम करावीत. ती थंड करून दररोज केसांना लावावीत. त्यामुळे केस गळण्याचे थांबतील.
- मेथीचे बी पाण्यात रात्री भिजत टाका. सकाळी उंबळलेले बी वाटा आणि त्याचा लेप एक तास तरी केसांना लावून त्यानंतर केस धुवा. हे केल्यानंतर काही दिवसांनी केस गळतीचे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळेल. तसेच नवीन केस उगवण्यासाठी मदत होईल.
- नारळाच्या तेलात कापूर मिसळून केसांना लावणे अधिक चांगले. केस धुण्याआधी एक तास हे तेल केसांना लावणे आवश्यक आहे. त्यामुळे केस गळायचे थांबतात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.