.... तर तुमचे केस गळणं बंद होईल!

केस गळणे एक सामान्य बाब आहे, मात्र प्रमाणापेक्षा जास्त गळती होत असेल, तर असे केस टिकवून ठेवणंही महत्वाचं आहे, यासाठी मोठ्या प्रमाणात उपचार केले जातात. अतिशय महागड्या उपचारांचाही यात समावेश आहे. हे महागडे उपचार किती प्रभावी ठरतात हा देखील एक वेगळा मुद्दा आहे.

Updated: Jul 5, 2015, 01:11 PM IST
.... तर तुमचे केस गळणं बंद होईल! title=

नवी दिल्ली : केस गळणे एक सामान्य बाब आहे, मात्र प्रमाणापेक्षा जास्त गळती होत असेल, तर असे केस टिकवून ठेवणंही महत्वाचं आहे, यासाठी मोठ्या प्रमाणात उपचार केले जातात. अतिशय महागड्या उपचारांचाही यात समावेश आहे. हे महागडे उपचार किती प्रभावी ठरतात हा देखील एक वेगळा मुद्दा आहे.

जाणकारांच्या मते अॅलोपॅथिक उपचार अतिशय महागडे असतात, म्हणून काही घरगुती उपचारांनी केस उगवता येऊ शकतात असं म्हटलं जातं. मात्र घरगुती उपचारांमुळे केसांचं गळण कमी करता येऊ शकतं. जर तुमचा आहार चांगला, योग्य असेल आणि वेळेवर जेवण असेल, तर तुमचे केस गळण तर बंद होईलच पण ते नेहमी मजबूत देखील राहतील.

केस गळती बंद करण्याचा उपाय
केस प्रोटीनपासून तयार होतात, यासाठी खाण्यात जास्तच जास्त प्रोटीनय़ुक्त पदार्थ असले पाहिजे, हिरवा भाजीपाला, फळ, दुध, तसेच तुम्ही मांसाहारी असाल तर, मटण किंवा मासे यांच्यातही प्रोटीन असतात.

शरीरात लोहच प्रमाण कमी असलं तरीही केस गळतात, म्हणून खाण्यात लोहचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असायला हवं. विटामीन ई केस वाढीत मदत करत असतं. म्हणून विटामीन ई-युक्त आहारही महत्वाचा आहे. झिंकचं प्रमाण असलेला आहारही महत्वाचा आहे, झिंक केस गळणे आणि पांढरे होण्यापासून वाचवतं. तुमच्या जेवणात काजू, बदाम, दूध असावं, त्यातील कॉपरही फायदेशीर असतं, तसेच दिवसभरात तुमच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण जराही कमी व्हायला नको.

केस गळणं थांबवण्याचा रामबाण उपाय
तीन ते चार चमचे बेल पावडर रात्री थंड पाण्यात भिजवा, सकाळी त्याच्यात १० ते १५ ग्रॅम गुळ टाका, या पाण्याला अतिशय बारिक सुती कपड्याने गाळा. या मिश्रणाने केसंना १५ मिनिटं मालीश करा, दोन ते तीन महिन्यांनी तुमचे केस गळणं बंद होईल. जेव्हा केस गळणं बंद होईल, तेव्हा मुळाशी तेल लावणं विसरू नका, यामुळे डोक्याच्या स्कीनवर कोंडा होत नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.