दारुसोबत चखना का दिला जातो?...घ्या जाणून

ओली पार्टी म्हटली की दारुसोबत चखना हा आलाच. दारुचे सेवन करताना चखना हा तोंडाची चव वाढवण्यासाठी घेतला जातो. चख मध्ये तळलेले काजू, शेंगदाणे, शेव, वेफर्स, मुगाची डाळ अशा चमचमीत पदार्थांचा समावेश असतो. 

Updated: Mar 20, 2017, 09:03 AM IST
दारुसोबत चखना का दिला जातो?...घ्या जाणून title=

मुंबई : ओली पार्टी म्हटली की दारुसोबत चखना हा आलाच. दारुचे सेवन करताना चकणा हा तोंडाची चव वाढवण्यासाठी घेतला जातो. चखन्यामध्ये तळलेले काजू, शेंगदाणे, शेव, वेफर्स, मुगाची डाळ अशा चमचमीत पदार्थांचा समावेश असतो. 

मात्र नेहमी दारुसोबत चखना खाण्याचे कारण तुम्हाला माहीत आहे का? तर तुम्ही म्हणाल दारुचे सेवन करताना तोंडाला चव येण्यासाठी हे पदार्थ खाल्ले जात असावेत. मात्र हे खरे कारण नाहीये. तर यामागे दारुची विक्री करणाऱ्या दुकानदारांचा मोठा फायदा आहे.

जेव्हा आपण एखादा खारट वा तिखट पदार्थ खातो. तेव्हा आपल्याला शरीराला पाण्याची गरज अधिक असते. त्याचप्रमाणे जेव्हा दारुचे सेवन करताना हा खारट आणि तिखट चखना खाल्ला जातो तेव्हा शरीरातील द्रव्याचे प्रमाण कमी होत जाते आणि त्यामुळे तहान लागते.

दरम्यान, दारुचे सेवन करणारे यावेळी पाणी न पिता दारुचे अधिक सेवन करतात. त्यामुळे चखन्यामुळे दारुचे सेवनही अधिक होते. यामुळे साहजिकच दारुची विक्री करणाऱ्यांना याचा फायदा होतो.