कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात या पदार्थांचा करा समावेश

चांगले आरोग्य राखण्यासाठी योग्य आणि पोषक आहार महत्त्वाचा असतो. हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे पोषक आहाराकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करायचे असल्यास खालील पदार्थांचा आहारात नक्की समावेश करा.

Updated: Jan 2, 2017, 04:17 PM IST
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात या पदार्थांचा करा समावेश title=

मुंबई : चांगले आरोग्य राखण्यासाठी योग्य आणि पोषक आहार महत्त्वाचा असतो. हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे पोषक आहाराकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करायचे असल्यास खालील पदार्थांचा आहारात नक्की समावेश करा.

ऑलिव्ह ऑईल - ऑलिव्ह ऑईलमध्ये असलेल्या अँटी-ऑक्सिडंट्समुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

लसूण - लसणाचा आहारात नेहमी समावेश करावा. यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. 

सुकामेवा - अक्रोड, बदाम यासारखा सुकामेवा केवळ चविष्टच नसतो तर आरोग्यासाठीही तितकाच फायदेशीर. सुकामेवा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते. तसेच हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. 

अॅवोकॅडो - अॅवोकॅडोमध्ये बीटा-सिस्टोसेरॉल मोठ्या प्रमाणात असते ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. 

मासे - आहारात नियमितपणे माशांचा समावेश केल्यास हृदयाचे आरोग्य चांगले राहते. यात मोठ्या प्रमाणात ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स असतात. ज्यामुळे ब्लड प्रेशर कमी होते. 

ओटमील - ओटमीलमध्ये सॉल्यूबल फायबर असतात. ज्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.