तंबाखू प्रत्यक्षात कर्करोग बरा करतो?

तंबाखू आणि कॅन्सरचं खूप जवळचं नातं आहे. तंबाखूमुळं तोंडाचा कॅन्सर होतो ते टाळा हे आपल्याला माहितच आहे. मात्र काही संशोधकांच्या मते तंबाखूच्या झाडांच्या पानात कॅन्सरचा नाश करण्याचं मेकॅनिझम आहे. एका रेणूवर NaD1 जो की तंबाखूच्या फुलांमध्ये असतो जे बॅक्टेरिया आणि बुरशीसोबत लढतो.

Aparna Deshpande | Updated: Apr 8, 2014, 03:30 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, मेलबर्न
तंबाखू आणि कॅन्सरचं खूप जवळचं नातं आहे. तंबाखूमुळं तोंडाचा कॅन्सर होतो ते टाळा हे आपल्याला माहितच आहे. मात्र काही संशोधकांच्या मते तंबाखूच्या झाडांच्या पानात कॅन्सरचा नाश करण्याचं मेकॅनिझम आहे. एका रेणूवर NaD1 जो की तंबाखूच्या फुलांमध्ये असतो जे बॅक्टेरिया आणि बुरशीसोबत लढतो.
या मॉलिक्युलमध्ये कॅन्सरला ओळखण्याची आणि त्याचा नाश करण्याची शक्ती आहे, हे संशोधनात पुढं आलंय. ला ट्रोब इन्सिट्यूट ऑफ मॉलिक्युलर सायंस, मेलबर्न चे संशोधक मार्क ह्युलेट म्हणाले, की हे खूप महत्त्वाचं आणि वेगळं संशोधन आहे. (अधिक वाचा- Smokeless tobacco use rise in India)
जे मॉलिक्युल निकोटीना सेल्वेस्ट्रीस nicotiana sylvestris (flowering tobacco) झाडात असतात, ते पिंसर सारखी रचना तयार करून कॅन्सर सेल्सच्या मेंब्रेनमध्ये असलेल्या लिपिड्समध्ये जातात आणि मग कॅन्सरच्या सेल्सची वाढ होऊ देत नाही.
संशोधकांच्या मते मायक्रोबिएल इन्फेक्शनसाठी अँटिबायोटिक ट्रिटमेंट म्हणूनही या प्रोसेसचा वापर होऊ शकतो. त्यात तेवढी क्षमता आहे. यासाठीचं प्रि-क्लिनिकल काम मेलबर्नच्या हेक्झिमा या बायोटेक्नोलॉजी कंपनीला दिलंय. लवकरच याच्या प्राथमिक चाचण्या घेतल्या जातील, असं ह्युलेट यांनी सांगितलंय. तसंच यासंबंधीचा अहवाल eलाईफ जर्नलमध्ये प्रकाशित होईल.
[Source: eLife, La Trobe University]

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.