सर्दी, ताप,खोकल्यावर रामबाण उपाय तुळस

बदलत्या वातावरणामुळे अनेकांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो. त्यावर घरगुती उपाय करुन तुम्ही सूटका मिळवू शकता. रोग प्रतिरोधक क्षमता कमी झाल्याने सर्दी, ताप याचा त्रास होतो. यावर रामबाण उपाय म्हणजे तुळस.

Updated: Oct 31, 2016, 08:36 PM IST
सर्दी, ताप,खोकल्यावर रामबाण उपाय तुळस title=

मुंबई : बदलत्या वातावरणामुळे अनेकांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो. त्यावर घरगुती उपाय करुन तुम्ही सूटका मिळवू शकता. रोग प्रतिरोधक क्षमता कमी झाल्याने सर्दी, ताप याचा त्रास होतो. यावर रामबाण उपाय म्हणजे तुळस.

तुळसीच्या पानांमध्ये आयुर्वेदिक गुण आहेत. इम्यूनिटीला बूस्ट करण्यासाठी ती मदत करते. ताण-तणाव, डोखेदुखी आणि इंफेक्शन या सारख्या गोष्टींवर तुळस फायदेशीर ठरते.

1. तुळशीच्या पानांचा चहा

एक कप पाण्यात पाच ते सहा तुळशीची मान टाकून  की उकळावी. ५ ते १० मिनिटं उकल्यानंतर एक कपात ते पाणी गाळून घ्या. दिवसात दोनदा अशी चहा प्यायल्याने ताप आणि सर्दीपासून सूटका मिळू शकते. मलेरीया आणि डेंग्यूपासूनही लांब राहू शकता.

2. तुलशीची पाने टाकून प्या दूध

जर ताप कमी होत नसेल तर तुळशीचं दूध प्यायल्याने फायदा होतो. अर्धा लीटर दूधात तुळशीची काही पाने आणि दालचीनी चांगल्या प्रकारे उकळून घ्या. त्यामध्ये थोडी साखर टाका. अशा प्रकारे दूध प्यायल्याने तुमचा ताप कमी होण्यास मदत होईल. व्हायरल तापापासून लांब राहण्यासाठी हे अधिक फायदेशीर ठरते.

3. तुळशीचा रस

तुळशीचा रस चाप आणि सर्दीवर फायदेशीर ठरते. मुलांना खासकरुन याचा अधिक फायदा होतो. 10 ते 15 तुळशीच्या पानांचा रस काढून दोन ते तीन तासामध्ये घेत राहा. याचा लवकरच फायदा जाणवेल.