वजन कमी करायचेय तर जिममध्ये न जाता एवढेच करा!

आपण आपले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करीत असाल तर जिममध्ये जाण्याची गरज नाही. सकाळी पहाटे उठून जिममध्ये जाऊन त्यासाठी घाम गाळण्याची आवश्यकता नाही. तुम्ही कामावर किंवा कार्यालयात जाण्यासाठी खासगी वाहनांचा वापर न करता सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करा. बघा तुमचा लठ्ठपणा कमी होतो की नाही तो!

Updated: Aug 21, 2014, 08:54 PM IST
वजन कमी करायचेय तर जिममध्ये न जाता एवढेच करा! title=

नवी दिल्ली : आपण आपले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करीत असाल तर जिममध्ये जाण्याची गरज नाही. सकाळी पहाटे उठून जिममध्ये जाऊन त्यासाठी घाम गाळण्याची आवश्यकता नाही. तुम्ही कामावर किंवा कार्यालयात जाण्यासाठी खासगी वाहनांचा वापर न करता सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करा. बघा तुमचा लठ्ठपणा कमी होतो की नाही तो!

इंग्लंडमध्ये लठ्ठपणा कमी करण्याबाबत अभ्यास करण्यात आला. जे लोक खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घेतात, त्यांची चर्बी कमी झालेली दिसून आली. जे लोक कार्यालयात जाण्यासाठी स्टेशनपर्यंत पायी जातात त्यांचा लठ्ठपणा वाढत नाही. पायी जाण्यामुळे वजन कमी होते.

लंडन स्कूल ऑफ हायजिन अॅंड ट्रॉफिकल मेडिसिन आणि लंडन कॉलेज विश्वविद्यालयाने सक्रिय वाहतूक आणि लठ्ठपणा अशा दोन मुख्य सूची केल्यात. बॉडी मास इंडेक्स आणि पर्सेटेज फॅट यांच्या संबंधातील तुलना करत अभ्यास केला गेला. ब्रिटनमधील 'ब्रिटीश मेडिकल जर्नल' या शोध पत्रिकेच्या ताज्या अंकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. पायी चालल्यामुळे, सायकल चालविल्याने आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्यांचे आरोग्य चांगले राहते. त्यांचे जवळपास तीन किलो वजन कमी झाले आहे.

७६ टक्के पुरुष आणि ७२ टक्के महिला स्वत:च्या वाहनांचा वापर करीत आहेत. तर १० टक्के पुरुष आणि ११ टक्के महिला या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत असल्याचे या संशोधन अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.