सफरचंदावर मेणाचे थर, दुष्परिणाम करती आरोग्यावर

आपल्या भारतात घराच्या सौंदर्य प्रसाधनात कपाळाला कुंकू लावताना ते कापल्या कपाळाला चिटकून राहावं यासाठी मेणाचा वापर होत असे. मात्र या मेणाचा उपयोग फळांना चकाकी आणण्याकरिता होतोय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 8, 2013, 08:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आपल्या भारतात घराच्या सौंदर्य प्रसाधनात कपाळाला कुंकू लावताना ते कापल्या कपाळाला चिटकून राहावं यासाठी मेणाचा वापर होत असे. मात्र या मेणाचा उपयोग फळांना चकाकी आणण्याकरिता होतोय. हे मानवी शरीराला खूप घातक आहे.
सफरचंद या फळाला चकाकी आणण्यासाठी मेणाचा लेप लावतात हे आपणाला माहितही नसेल, आपण सफरचंद खूप चकाकतं. त्यामुळे ते खूपच ताजं आहे. म्हणून जास्त पैसे देऊन खरेदी करतो. मात्र असं सफरचंद खरेदी करताना विचार करा कारण या सफरचंदाला मेणाचा लेप लावला आहे. आपण कितीही पाण्याने हे फळ धुतलं तरी मेण निघत नाही आणि ते खाल्ल्यानंतर थेट आपल्या पोटात जातं. कायद्यानुसार मेणाचा लेप लावण्यास प्रतिबंध आहे. मात्र काही अंशी ते पॅकिंगच्या कायद्यात आहे. त्याही खूपच कमी प्रमाण आहे. मात्र व्यापारी कच्चे सफरचंद ही पिकलेले लाल भडक दिसावे आणि चकाकी येण्यासाठी मेणाचा जास्त प्रमाणात लेप देतात.
सफरचंद हे फळ आजारी माणसाला ताकद देण्यासाठी डॉक्टर या फळाचे सेवन करण्याचा सल्ला देतात. आणि प्रत्येक घरातील लहानग्यालाही हे फळ म्हणजे खूप आवडीचं असतं. मात्र या फळाला मेणाचा जास्त प्रमाणात लेप दिल्याने मेणाचा थर लहान आतड्यावर बसतो आणि पचनक्रिया बिघडवते. मेणाच्या लेपचा वापर हा शरीराला घटक असल्याचे भेसळ प्रतिबंधक विभाग ही सांगतोय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.