वजन कमी होत नाही, काय कराल?

काही लोकांचे खूप जास्त वजन असते मग वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करतात. काही जण डाएट करतात, काही जण जीमला जातात. खूप मेहनत केल्यानंतर कुठे थोडे फार वजन कमी होते. पण काही महिन्यांमध्येच पहिल्यापेक्षा जास्त वजन वाढते. आणि मग तुम्ही फक्त विचार करत राहता की, आता काय करायचं?

Updated: Sep 4, 2013, 02:36 PM IST

www.24taas.com झी मीडिया, नवी दिल्ली
काही लोकांचे खूप जास्त वजन असते मग वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करतात. काही जण डाएट करतात, काही जण जीमला जातात. खूप मेहनत केल्यानंतर कुठे थोडे फार वजन कमी होते. पण काही महिन्यांमध्येच पहिल्यापेक्षा जास्त वजन वाढते. आणि मग तुम्ही फक्त विचार करत राहता की, आता काय करायचं?
मेहनत घेतल्याने वजन कमी होते पण तसं झाल्यानंतर एवढे दुर्लक्ष करता की, वजन कमी होण्यापेक्षा वाढतच जाते. मग वजन कमी झाल्यावर कसे लक्ष दिले पाहिजे, त्यासाठी काय केले पाहिजे, याचा विचार करणे जास्त गरजेचे आहे.
डाएट करत असतांना खान्या-पिण्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवले जाते. त्यामुळे वजन कमी होते पण डाएट झाल्यानंतर पुन्हा पहिल्यासारखे फॅटी डिश खाणे चालू करतात. त्यामुळे त्याचा तुमच्या शरिरावर नकारात्मक प्रभाव पडतो आणि कमी झालेले वजन दुप्पटीने वाढते.
व्यायाम हा नियमित करणे गरजेचे आहे. तुम्ही जीममध्ये दोन तीन तास खुप वर्कआऊट करतात. आणि काही काळानंतर सोडून देतात. त्यामुळे वजन तर वाढतेच पण झोप न लागणे, थकवा येणे यासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे वजन कमी झाल्यावर वर्कआऊट पुर्ण न थांबवता थोड्याप्रमाणात वर्कआऊट करत राहिले पाहिजे.
तुम्ही वेळोवेळी वजन किती आहे यावर लक्ष ठेवले पाहिजे. आपण खूप मेहनत घेतली आणि तीन महिन्यात ५ किलो वजन घटवले पण नंतर त्याकडे लक्षच नाही दिले तर कळत नाही वजन वाढते की कमी होते. त्यामुळे वजन केले पाहिजे.
तुम्ही जर तुमच्या वजनाकडे नीट लक्ष दिले तर तुमची तब्बेत पण एकदम ठीक राहू शकते. सर्व आजार तुमच्यापासून लांब राहतील. त्यामुळे नियमितपणे व्यायाम केला पाहिजे, योगासने केले पाहिजे. दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पिणे फार गरजेचे आहे.
वजन कमी करायचे असेल तर वेळ काढून ते कमी करतात.पण एकदा का वजन कमी झाले की मग त्याकडे लक्ष देत नाही अशावेळी मग कामात असतांना लिफ्टचा उपयोग न करता पायऱ्याचा उपयोग करावा.
जवळपासच्या दुकानात जाण्यासाठी गाडीचा उपयोग न करता चालत जाणे पसंत करावे. या गोष्टी नियमित केल्याने नक्कीच तुम्ही फिट राहाल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.