चीनचा 'स्प्रिंग फेस्टिव्हल'...

Feb 6, 2013, 02:46 PM IST
चिनी नववर्ष हा चिनी संस्कृतीतील सर्वांत मोठा सण... रविवारी, १० फेब्रुवारीपासून होणार सुरुवात
1/13

चीनमध्ये हा उत्सव ‘वसंतोत्सव’ (स्प्रिंग फेस्टिव्हल) म्हणूनदेखील ओळखला जातो.
2/13

चिनी दिनदर्शिकेनुसार या काळात शिशिर ऋतूचा शेवट होऊन उन्हाळ्याची सुरुवात होते.
3/13

उत्सवाची सुरुवात नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी होते आणि १५ व्या दिवशी कंदील उत्सवाने समारोप होतो.
4/13

चिनी दिनदर्शिका चंद्र आणि सूर्याच्या गतीवर आधारित असल्यामुळे चिनी नववर्ष हे ‘चांद्रमासिक नववर्ष’ म्हणून ओळखले जाते.
5/13

नववर्षाच्या सायंकाळी, चिनी कुटुंबे वार्षिक सहभोजनासाठी एकत्र जमतात.
6/13

चिनी नववर्ष हे जगभरात चिनी लोकसंख्या अधिक असणाऱ्या देशा-प्रदेशांमध्ये साजरा केला जातो.
7/13

चीनचे जनता प्रजासत्ताक, हाँग काँग, मकाऊ, तायवान, सिंगापूर,थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, मॉरिशस, फिलिपिन्स, व्हिएतनाम, आणि जगभरातील चायना टाउनांमध्ये साजरा केला जातो. चीनच्या शेजारी देशांमध्येही या उत्सवाचा प्रभाव आहे.
8/13

लोक भेटवस्तू, कपडे, भोजन आणि सुशोभीकरणाच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.
9/13

घरातील दुर्भाग्य दूर करून सद्भाग्य आणि प्रगतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी, चिनी परंपरेनुसार घराची साफसफाई करण्याचा रिवाज आहे.
10/13

दरवाजे आणि खिडक्यांवर उत्तम आरोग्य, आनंद, संपत्ती आणि वृद्धी दर्शवणाऱ्या लाल रंगाच्या कागदी कलाकृतींचा वापर सजावटीसाठी केला जातो.
11/13

दुसऱ्या दिवशी सकाळी, वडीलधाऱ्यांना लहान पोरे व तरुण कुटुंबीय उत्तम आरोग्य आणि भरभराटीच्या शुभेच्छा देतात तर वडीलधारे त्यांना पैसे भरलेले लाल लिफाफे देतात.
12/13

1.	चिनी परंपरेनुसार वर्षगणना ही सलग अंकांमध्ये मोजली जात नाही. चीनबाहेर, पिवळ्या सम्राटाच्या कारकिर्दीपासून वर्षगणना केली जाते
13/13