सामना हारलो, मालिका जिंकलो!

धर्मशाळा वन-डेमध्ये टीम इंडियाला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. ईयान बेलच्या शानदार सेंच्युरीच्या जोरावर भारताला अखेरच्या वन-डेमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. शेवटची वन-डे गमावली असली तरी, भारतानं पाच वन-डे मॅचेसची सीरिज 3-2 नं जिंकली आहे.

जयवंत पाटील | Updated: Jan 27, 2013, 05:21 PM IST

www.24taas.com, धर्मशाळा
धर्मशाळा वन-डेमध्ये टीम इंडियाला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. ईयान बेलच्या शानदार सेंच्युरीच्या जोरावर भारताला अखेरच्या वन-डेमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. शेवटची वन-डे गमावली असली तरी, भारतानं पाच वन-डे मॅचेसची सीरिज 3-2 नं जिंकली आहे.
धर्मशाळा वन-डेमध्ये टीम इंडियाची टॉप ऑर्डर कोसळली आहे. इंग्लिश टीमच्या तेज मा-यासमोर टीम इंडियाच्या बॅट्समनचं काहीच चालल नाही. गौतम गंभीर, रोहित शर्मा, विराट कोहली आणि युवराज सिंग हे भारताचे आघाडीचे बॅट्समन 50 रन्सच्या आतमध्येच पॅव्हेलियनमध्ये परतले होते.
त्यानंतर कॅप्टन महेंद्रसिगं धोनी 15 रन्सवर आऊट झाला. टीम इंडियानं वन-डे सीरिज आधीच जिंकली आहे. ही वन-डे जिंकत 4-1 नं सीरिज खिशात घालण्याची धोनी अँड कंपनीला नामी संधी आहे. धोनी आऊट झाल्यानंतर रैना आणि जडेजा यांनी बऱ्यापैक डाव सावरला. रैनाने पुन्हा एकदा संयमी खेळी करीत आपलं अर्धशतक साजरं केलं...