Assembly Election Results 2017

टीम इंडियाचं काय होणार?

टीम इंडियाच्या मागे लागलेलं पराभवाचं दुष्टचक्र संपायचं नावच घेताना दिसत नाही आहे.

Updated: Jan 15, 2013, 12:14 PM IST

www.24taas.com, कोची
टीम इंडियाच्या मागे लागलेलं पराभवाचं दुष्टचक्र संपायचं नावच घेताना दिसत नाही आहे... पाकिस्तानविरूद्ध वन-डे सीरिज गमावल्यानंतर टीम इंडियाला इंग्लंडविरूद्ध पहिल्या राजकोट वन-डेत 9 रनने पराभव पचवावा लागला... त्यामुळे टीम इंडियासमोर कोची वन-डे जिंकण्याचं आव्हान असणार आहे...
इंग्लंडविरूद्ध वन-डे सीरिजमध्ये पत वाचवण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या टीम इंडियाचे मनसुबे राजकोट वन-डेत झालेल्या पराभवाने उधळले गेले आहेत... इंग्लंडने रचलेल्या रन्सच्या शिखरापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न टीम इंडियाच्या बलाढ्य बॅटिंग लाईनअपने केला... मात्र केलेले प्रयत्न तोकडे पडले आणि पदरी निराशाच पडली...
त्यामुळे कोची वन-डेत विजय मिळवण्याकरता टीम इंडियाच्या सर्वच बॅट्समन्सना जी तोड मेहनत करावी लागणार आहे... राजकोट वन-डेत भारताला 96 रन्सची दमदार ओपनिंग करून दिल्यानंतर...चुकीच्या पद्धतीने आऊट झालेल्या गौतम गंभीर आणि अजिंक्य रहाणे जोडीवर अधिकाधिक वेळ पिचवर उभं राहत वेगाने रन्स करण्याची जबाबदारी असणार आहे... तर तिस-या पोझिशनवर बॅटिंगला येणा-या विराट कोहलीच्या परफॉर्मन्सवर सर्वांच्या नजरा खिळलेल्या असणार आहेत...
पाकिस्तानविरूद्ध झालेल्या वन-डे सीरिजमध्ये साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या विराटला कोची वन-डेत दमदार कामगिरी करण्याची संधी असेल... राजकोट वन-डेत विराट केवळ 15 रन्सच करू शकला... मिडल ऑर्डरमध्ये युवराज सिंगचा झंझावात रोखण्याचं आव्हान इंग्लिश बॉलर्सपुढे असणार आहे... राजकोट वन-डेत युवीने धडाकेबाज 61 रन्सची खेळी केली होती..
याआधीचा युवराजचा मायदेशातीस इंग्लंडविरूद्धचा इतिहासही इंग्लंडच्या छातीत धडकी भरवणारा आहे... तर कॅप्टन धोनीसह सुरेश रैनालाही चांगली लय सापडली असली.. तर मोक्याच्या क्षणी पीचवर उभे राहत टीमला मोठं टार्गेट गाठून देण्याची तसेच प्रतिस्पर्ध्यांपुढे मोठं टार्गेट उभारण्याची जबाबदारी या दोघांना पार पाडावी लागेल... तरच टीम इंडियाला इंग्लंडविरूद्ध कोची वन-डेत मोठा विजय साजरा करता येईल...