भारत-पाक मॅच होती फिक्स

By Prashant Jadhav | Last Updated: Monday, January 7, 2013 - 18:26

www.24taas.com, मेलबर्न
कडाक्याच्या थंडीत रविवारी दिल्लीत भारत-पाक दरम्यान झालेल्या शेवटच्या वन-डेत भारताने पाकवर १० धावांनी विजय मिळवला. परंतु आता या विजयावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
इंग्लडचा माजी विकेटकीपर पॉल निक्सन याने कोटलातील मॅच फिक्स असू शकतो, अशी शंका उपस्थित केली आहे. तसेच त्याने टीम इंडियाच्या निवडीवरबाबतही अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.
इंग्लडसाठी १९ वन डे आणि एक टी-२० सामना खेळणारा निक्सन म्हणाला, पाकिस्तानने तीन मॅचच्या सीरिजपैकी पहिल्या दोन मॅच खिशात घातल्यामुळे त्यांना शेवटचा सामना गमावला तरी काही फरक पडणार नव्हता. त्यामुळे हा सामना फिक्स असण्याची शक्यता अधिक आहे.
पॉल निक्सन याने जून २०१२ मध्ये आपले जीवन चरित्र लिहिले, यात त्याने खळबळजनक काही खुलासे केले आहे. त्यानुसार भारतातील एका सट्टेबाजाने त्याला स्थानिक टी-२० हरण्यासाठी ५ दशलक्ष डॉल देण्याची ऑफऱ दिली होती.

First Published: Monday, January 7, 2013 - 18:22
comments powered by Disqus