टीम इंडिया आज जिंकणार का?

टीम इंडियाने पाकिस्तानमसोर वनडे क्रिकेटमध्ये गुडघे टेकले आहे. त्यामुळे वारंवार अपयशी ठरणारी टीम इंडिया शेवट गोड करणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: Jan 6, 2013, 12:48 PM IST

www.24taas.com,नवी दिल्ली
टीम इंडियाने पाकिस्तानमसोर वनडे क्रिकेटमध्ये गुडघे टेकले आहे. त्यामुळे वारंवार अपयशी ठरणारी टीम इंडिया शेवट गोड करणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
रविवारी दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या आणि शेवटच्या वन-डे लढतीत प्रतिष्ठा राखणार्या विजयाची नोंद करण्याचे आव्हान टीम इंडियापुढे आहे. भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी पाठदुखीने त्रस्त असून, आजच्या लढतीत त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.
दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या लढतीत भारताची मदार फलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. गेल्या दोन सामन्यांत भारतीय फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. यापूर्वी, १९८३ मध्ये भारतावर मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध पाच शून्यने क्लिन स्वीपची नामुष्की ओढवली होती.

धोनीचा अपवाद वगळता पाकच्या मार्या ला भारतीय फलंदाजांना सर्मथपणे तोंड देता आले नाही. गौतम गंभीर आणि विराट कोहली या दिल्लीकर फलंदाज काय कामगिरी करतात यावकडे लक्ष लागले आहे. असे असले तरी फलंदाजांचे अपयश भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे. या लढतीच्या निमित्ताने भारतीय संघाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

भारतीय संघ
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), गौतम गंभीर, विराट कोहली, युवराज सिंग, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विडन, भुवनेश्वटर कुमार, ईशांत शर्मा, अशोक डिंडा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, अमित मिश्रा व शमी अहमद.
पाकिस्तान संघ
मिस्बाह उल-हक (कर्णधार), नासिर जमशेद, मोहम्मद हफीज, अजहर अली, युनिस खान, शोएब मलिक, कामरान अकमल, सईद अजमल, उमर गुल, जुनेद खान, मोहम्मद इरफान, सोहेल तन्विर, उमर अकमल, अन्वर अली, हरिश सोहेल, इम्रान फरहात व जुल्फिकार बाबर.