भारताचा खुर्दा

Last Updated: Thursday, January 3, 2013 - 20:04

www.24taas.com, कोलकाता
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ऐतिहासिक ईडन गार्डनवरील दुसरा एकदिवसीय सामनाही भारताने ८६ धावांनी गमावला. याचबरोबर भारताने तीन सामन्यांची मालिका २-० अशी गमावली आहे. तब्बल ७ वर्षांनी भारताला मायभूमीत पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला आहे.
कोलकाता वन-डेमध्ये पाकिस्तानने टीम इंडियासमोर विजयासाठी २५१ रन्सचं आव्हान ठेवलं होतं. नासिर जमशेद आणि मोहम्मद हाफीजने पाकिस्तानला दमदार सुरूवात करून देताना १४१ रन्सची पार्टनरशिप केली. या जोडीला फोडण्यात रविंद्र जाडेजाला यश आल्यानंतर ठराविक अंतराने पाकिस्तानच्या विकेट्स गेल्या. नासिर जमशदने शानदार सेंच्युरी झळकावली. तर मोहम्मद हाफिजने ७६ रन्सची इनिंग खेळली. भारताकडून रविंद्र जाडेजाने सर्वाधिक ३ विकेट्स घतेल्या. तर ईशांतला २ विकेट्स मिळाल्या. आर. अश्विन, सुरेश रैना आणि भुवनेश्वर कुमारला प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
इंडिया-पाक दुसऱ्या टेस्टमध्ये भारतीय टीमला सुरवातीला पाकिस्तानच्या बॅट्समन्सना रोखणं कठिण गेलं मात्र रवींद्र जडेजाने हाफीजला बोल्ड केलं तर लगेचच त्याच्यापाठोपाठ अझर अलीला रनआऊट करण्यातही यश आलं त्यामुळे पाकिस्तानचा धावांचा ओघ थोडा कमी झाला आहे.
कोलकाता वन-डेमध्ये टीम इंडियाच्या बॉलर्सची पाकिस्तानी बॅट्समननी चांगलीच धुलाई केली. मोहम्मद हाफीजने आपल्या वन-डे करिअरमधील 15 वी हाफ सेंच्युरी झळकावली आहे. धोनीने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय साफ अपयशी ठरला.
या मॅचमध्ये भारतीय टीम पाच बॉलर्ससह खेळते आहे. मात्र, टीम इंडियाच्या बॉलर्सना पाक बॅट्समनना रोखण्यात साफ अपयश आलं. पहिली वन-डे धोनी अँड कंपनीने आधीच गमावली आहे. त्यामुळे दुसरी वन-डे भारतीय टीमसाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे दुसरी वन-डे जिंकत सीरिजमध्ये बरोबरी साधण्यासाठी माहीच्या टीमचा प्रयत्न असणार आहे.
ईडन गार्डनवर होणाऱ्या इंडिया-पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या वन-डे मॅचमध्ये इंडिया टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये भारताला जिकणं क्रमप्राप्त असल्याने संपूर्ण क्रिकेट चाहत्यांचे लक्ष या मॅचकडे लागून राहिले आहे. पहिल्या वन-डेत भारताचा झालेला पराभव यामुळे भारताला आपलं आव्हान टिकवून ठेवायचे असल्यास या मॅचमध्ये आपला खेळ उंचवावा लागणार आहे. टीम इंडियात एक बदल करण्यात आला आहे. रोहित शर्माला डच्चू देण्यात आला आहे. तर त्याऐवजी रवींद्र जाडेजाला संधी देण्यात आली आहे.
कोलकताच्या इडन गार्डन स्टेडियमवर होणाऱ्या भारत-पाक सामन्यावर पावसाच सावट होतं. आज दुपारी बारा वाजता सुरू होणार आहे. तत्पूर्वी आज पहाटेपासून कोलकात्यात पावसाने हजेरी लावली होती. मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला असल्याने ईडन गार्डनवरील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच मॅचला सुरवात झाली.
पावसामुळं मॅच उशिरा सुरु होणार आहे. ईडन गार्डनवर भारत-पाकिस्तानमध्ये सीरिजची दुसरी वनडे रंगणार आहे. सीरिजमध्ये १-०नं पिछाडीवर असणाऱ्या टीम इंडियासाठी ही लढत करो वा मरो अशीच असणार. तर पाकिस्तानी टीम कोलकात्यातच सीरिज जिंकण्यासाठी आतूर असणार आहे.

First Published: Thursday, January 3, 2013 - 11:51
comments powered by Disqus