पाकिस्तानचा भारतावर विजय

चेन्नई वन-डेमध्ये पाकिस्तानकडून टीम इंडियाला पराभव सहन करावा लागला. रंगतदार लढतीत भारताला पाकिस्तानकडून 6 विकेट्सने मात खावी लागली. नासिर जमशेदच्या मॅचविनिंग सेंच्युरीमुळे पाकला भारतावर मात करण्यात यश आलं.

सुरेंद्र गांगण | Updated: Dec 30, 2012, 06:43 PM IST

www.24taas.com,चेन्नई
चेन्नई वन-डेमध्ये पाकिस्तानकडून टीम इंडियाला पराभव सहन करावा लागला. रंगतदार लढतीत भारताला पाकिस्तानकडून 6 विकेट्सने मात खावी लागली. नासिर जमशेदच्या मॅचविनिंग सेंच्युरीमुळे पाकला भारतावर मात करण्यात यश आलं.
गचाळ फिल्डिंग आणि टॉप ऑर्डरने केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे टीम इंडियाला पाकविरुद्धच्या पहिल्या वन-डेमध्ये पराभव स्वीकारावा लागला. कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने केलेली 113 रन्सची झुंजार इनिंग व्यर्थ ठरली. धोनी आणि अश्विन वगळता एकाही भारतीय बॅट्समनला जुनैद खानचा सामना करता आला नाही. त्याने टीम इंडियाच्या चार टॉप ऑर्डर बॅट्समनना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या विजयासह पाकने तीन वन-डे मॅचेसच्या सीरीजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे.
बॅटिंगमध्येही टीम इंडियाची कामगिरी फारशी चांगली नव्हती. टीम इंडियाचे दिग्गज बॅट्समन पाकिस्तानी बॉलर्सपुढे सपशेल फेल ठरले...टीम इंडियाच्या पहिले चारही बॅट्समन्स एकामागे एक बोल्ड झाले. विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, विराट कोहली आणि त्यानंतर युवराज सिंग हे चारही मात्तबर बॅट्समन बोल्ड झालेत. त्यापैकी तीन विकेटतर एकट्या जुनैद खाननेच घेतल्या.
विरेंद्र सेहवाग 4, गंभीर 8, विराट शून्य तर युवराज 2 रन्सवर पेव्हेलियनमध्ये परतले. जुनैदनं सेहवाग, विराट आणि युवीला तर वनडेत डेब्यू करणारा 7 फूट 1 इंच उंचीच्या मोहम्मद इरफाननं गौतमची दांडी गुल केली.