बलात्कारविरोधी कायद्याला तिचे नाव?

By Surendra Gangan | Last Updated: Wednesday, January 2, 2013 - 15:22

www.24taas.com,नवी दिल्ली
दिल्लीतल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या पीडित मुलीचं नाव जाहीर करण्यास हरकत नसल्याचं मत तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलीय.
तसंच महिलांवरील अत्याचाराविरोधात करण्यात येणा-या नव्या कायद्यालाही या मुलीचं नाव देण्यास हरकत नसल्याचंही कुटुंबीयांनी नमूद केलंय. उलट हा पीडित मुलीचा गौरवच असल्याची प्रतिक्रिया कुटुंबीयांनी दिलीय.
महिला अत्याचार विरोधातील कायद्याला पीडित मुलीचं नाव द्यावं असं वक्तव्य काल केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी केलं होतं. त्यांच्या या सूचनेचं कुटुंबीयांनी स्वागतच केलंय.

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या मुलीचं नाव का लपवलं जातंय, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय.
इतकंच नाही, तर बलात्कारविरोधी नव्या कायद्याला त्या पीडित मुलीचंच नाव द्या, असा सल्लाही त्यांनी दिलाय. शशी थरुर यांनी ट्विटरवर ही प्रतिक्रिया दिलीय.

First Published: Wednesday, January 2, 2013 - 13:52
comments powered by Disqus