गोवा राज्यात शंभरामागे एकाला एडस?

गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा राज्यातील प्रत्येक गावात एक तरी एचआयव्हीचा पेशंट आहे.

Updated: Aug 11, 2014, 11:10 PM IST
गोवा राज्यात शंभरामागे एकाला एडस? title=

गोवा : गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा राज्यातील प्रत्येक गावात एक तरी एचआयव्हीचा पेशंट आहे.

गोव्याचे आरोग्य मंत्री लक्ष्मीकांत परसेकार यांनी विधानसभेत ही माहिती दिली आहे. परसेकर एड्सशी संबंधित प्रश्नाला विधानसभेत उत्तर देत होते.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार  गोव्यात 15 हजार एड्सग्रस्त आहेत. या आकड्यानुसार गोवा राज्यातील एक टक्के जनता एडसच्या जाळ्यात आहे.

परसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी 550 रूग्ण होते, यावर्षी ही संख्या कमी होईल. एड्सचा होणारा प्रसार थांबवण्यासाठी कडक उपाय योजना करण्याची गरज आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.