अर्थमंत्री अरुण जेटली यांचे 100 कोटींचे प्रेम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत मांडला. 2014-2015च्या अर्थसंकल्पात अरुण जेटली यांचे 100 कोटींचे प्रेम दिसून आले. त्यांनी अनेक प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची भरघोस तरतूद केली आहे. देशात 100 स्मार्ट शहरे बनविण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे जेटली यांनी सांगितले. त्यासाठी  7 हजार 600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Updated: Jul 10, 2014, 08:25 PM IST
अर्थमंत्री अरुण जेटली यांचे 100 कोटींचे प्रेम title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत मांडला. 2014-2015च्या अर्थसंकल्पात अरुण जेटली यांचे 100 कोटींचे प्रेम दिसून आले. त्यांनी अनेक प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची भरघोस तरतूद केली आहे. देशात 100 स्मार्ट शहरे बनविण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे जेटली यांनी सांगितले. त्यासाठी  7 हजार 600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

100 कोटींचे प्रकल्प

  • 'बेटी बचाव बेटी बढाओ' योजनेसाठी 100 कोटींची तरतूद
  • आदिवासींसाठी वनबंधू कल्याण योजनेतून 100 कोटींची तरतूद
  • शहरांत महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी 100 कोटींची तरतूद
  • प्रधानमंत्री सिंचन योजनेसाठी 1000 कोटींची तरतूद
  • व्हर्च्युअल क्लासरूमसाठी 100 कोटींची तरतूद
  • सुशासनासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद
  • मदरशांतील शाळांच्या विकासासाठी 100 कोटींची तरतूद
  • नदीजोड प्रकल्पाच्या अभ्यासासाठी 100 कोटींची तरतूद
  • नदी किनाऱ्यांच्या विकासासाठी 100 कोटींची तरतूद
  • ईशान्येकडील रेल्वे मार्गासाठी 100 कोटींची तरतूद
  • पर्यावरण बदलाचा अभ्यास करण्यासाठी 100 कोटींची तरतूद
  • मणिपूरला क्रीडा विद्यापीठ सुरू करणार, यासाठी 100 कोटींची तरतूद
  • औष्णिक विजेसाठी 100 कोटी रुपये खर्च करणार
  • शेतीच्या नव्या वाहिनीसाठी 100 कोटींची तरतूद
  • शेतजमीन आरोग्य योजना. माती परीक्षण आणि आरोग्य पत्रिका तयार करण्यासाठी 100 कोटी
  • राष्ट्रीय उद्योग कॉरिडोरचे मुख्यालय पुण्यात सुरू करणार. यासाठी 100 कोटींची तरतूद
  • उत्तराखंडमधल्या हिमालयाच्या अभ्यासासाठी 100 कोटींची तरतूद

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.