बिहारमध्ये छटपुजेदरम्यान 11 जणांचा मृ्त्यू

बिहारमध्ये छटपुजेदरम्यान घडलेल्या दोन दुर्घटनांमध्ये 11 जणांचा मृत्यू झालाय.

Updated: Nov 7, 2016, 11:43 AM IST
बिहारमध्ये छटपुजेदरम्यान 11 जणांचा मृ्त्यू title=

पाटणा : बिहारमध्ये छटपुजेदरम्यान घडलेल्या दोन दुर्घटनांमध्ये 11 जणांचा मृत्यू झालाय.

दरभंगा येथे रेल्वेच्या धडकेत सहा महिला ठार झाल्यात. छटपूजा आटोपून त्या घरी येत असताना ही दुर्घटना घडली. 

यावेळी ट्रॅक पार करत असताना दिल्लीहून येत असलेल्या स्वतंत्रता सेनानी एक्सप्रेस रेल्वेची धडक बसल्याने या पाचही महिलांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे मुझ्झफरपूर येथे पाच मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीये.