रेल्वेची साईट हॅक करणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थ्यांने कमावलेत करोडो रुपये

भारतीय रेल्वेची वेबसाईट हॅक करुन आरक्षण तिकीट काढणाऱ्या १२वीच्या एका विद्यार्थ्याला सीबीआयने अटक केलेय. हामिद असे या तरुणाचे नाव आहे. तो ३० सेकंदात आयआरटीसीची वेबसाईट हॅक करायचा आणि अनेक तिकीट काढून तो दलालांना विक्री करायचा. यातून त्यांने कोट्यवधी रुपये कमावलेत.

Updated: Apr 29, 2016, 01:35 PM IST
रेल्वेची साईट हॅक करणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थ्यांने कमावलेत करोडो रुपये title=

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची वेबसाईट हॅक करुन आरक्षण तिकीट काढणाऱ्या १२वीच्या एका विद्यार्थ्याला सीबीआयने अटक केलेय. हामिद असे या तरुणाचे नाव आहे. तो ३० सेकंदात आयआरटीसीची वेबसाईट हॅक करायचा आणि अनेक तिकीट काढून तो दलालांना विक्री करायचा. यातून त्यांने कोट्यवधी रुपये कमावलेत.

३० सेकंदात झुगाड

हामिदचे कारनामे बघून रेल्वेचे अधिकारीही चक्रावलेत. हामिद केवळ ३० सेकंदात झुगाड करायचा. त्याने आतापर्यंत देशातील अनेक कानाकोपऱ्यात संपर्क ठेवला होता. तो अनेक दलालांच्या संपर्कात होता. रेल्वे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचे उघड झाले होते. याला चाप लावण्यासाठी प्रयत्न सुरु होता. अधिकाऱ्यांनी पाळत ठेवून हामिदचा कारनामा उघड करण्यात यश मिळवले.

५० लाखांची रोकडसह मोठे साहित्य जप्त

सीबीआयने हामिदकडून १० लॅपटॉप, १६ एटीएम कार्ड, दोन पॅनकार्ड यांच्यासह ५० लाखांची रोखड जप्त केलेय. तो कप्नानगंज येथील मामाच्या धुनिया टोला येथील घरातून हा गोरखधंडा चालवत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.