दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यात तरुणाला अटक

दहशतवादी हल्ल्याच्या अफवा पसरवण्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यात एका तरुणाला पोलिसांनी अटक केलीय. 

Updated: Jan 22, 2015, 01:52 PM IST
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यात तरुणाला अटक title=

पणजी : दहशतवादी हल्ल्याच्या अफवा पसरवण्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यात एका तरुणाला पोलिसांनी अटक केलीय. 

प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतात पाहुणे म्हणून दाखल होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ओबामांच्या भेटी दरम्यान दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केलीय. 

१९ वर्षाच्या या तरुणानं पोलिसांना फोन करून प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ला घडवून आणण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.