आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून २ जणांना अटक

गुजरातमधून आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून दोन जणांना अटक केली आहे. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केलीय. गुजरातमधून आयसिसशी संबंधित कुणाला अटक करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Updated: Feb 26, 2017, 07:04 PM IST
आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून २ जणांना अटक title=

गांधीनगर : गुजरातमधून आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून दोन जणांना अटक केली आहे. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केलीय. गुजरातमधून आयसिसशी संबंधित कुणाला अटक करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

अटक करण्यात आलेले दोघेही कॉम्प्युटर हाताळण्यात माहीर आहेत. हे दोघंही सख्खे भाऊ असल्याचं सांगण्यात येतं आहे. यापैकी एकाला राजकोट तर दुस-याला भावनगरमधून अटक करण्यात आली आहे. एकाने एमसीए, तर दुस-याने बीसीएची पदवी घेतलीय. सौराष्ट्रातील धार्मिक स्थळ, मॉल्स आणि अन्य प्रसिद्ध ठिकाणांवर हल्ला करण्याची योजना होती. सोमनाथ मंदिर आणि चोटीला चामुंडा माता मंदिर या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होतं. अटक करण्यात आलेल्या दोघा भावांची पोलीस चौकशी करत आहेत.