डॉक्टरांनी महिलेच्या पोटातून काढली २२ किलोची गाठ

मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्यातील डॉक्टरांनी महिलेच्या पोटातून २२ किलोची गाठ काढली आहे. डॉक्टरांचा असा दावा आहे की ही सर्जरी, सर्जरी क्षेत्रातील एक नवा विक्रम म्हणता येईल. 

Updated: Nov 10, 2015, 05:09 PM IST
डॉक्टरांनी महिलेच्या पोटातून काढली २२ किलोची गाठ title=

इंदूर : मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्यातील डॉक्टरांनी महिलेच्या पोटातून २२ किलोची गाठ काढली आहे. डॉक्टरांचा असा दावा आहे की ही सर्जरी, सर्जरी क्षेत्रातील एक नवा विक्रम म्हणता येईल. 

मानवाच्या शरीरातून ऑपरेशनने आतापर्यंत ६ किलोची गाठ काढल्याचा रेकॉर्ड आहे. ज्या आदिवासी युवतीच्या पेटातून ट्यूमर काढण्यात आला, ती आता धोक्याबाहेर आहे, तिची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

जामठीची रहिवासी असलेली आदिवासी युवती सरस्वती उईकेला ओवेरियन सिस्टचा आजार होता. महिलेच्या पोटात अनेक दिवसांपासून दुखत होतं, याआधीही सरस्वतीच्या पोटातून पाणी काढण्यात आलं होतं, तरीही एकेदिवशी तिची तब्येत आणखी बिघडली, तपासणीत गाठ आढळली, त्यानंतर ऑपरेशन करण्यात आलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.