222 माओवाद्यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

ओडिशातील मलकांगिरी जिल्ह्यातील 222 माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यात 72 महिलांचाही समावेश आहे. 

Updated: Nov 23, 2016, 11:14 AM IST
 222 माओवाद्यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण title=

भुवनेश्वर : ओडिशातील मलकांगिरी जिल्ह्यातील 222 माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यात 72 महिलांचाही समावेश आहे. 

या आत्मसमर्पित माओवाद्यांचं पुनवर्सन करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलंय. सरकारदेखील गेल्या काही दिवसांपासून या माओवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करीत होते. 222 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर सरकारच्या प्रयत्नांना यश आले आहे.

केंद्र सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटाबंदी केल्यानंतर त्यांचा थेट फटका माओवाद्यांच्या नेटवर्कला बसला होता. माओवाद्यांच्या रोखीच्या व्यवहारावर याचा परिणाम दिसू लागला होता. यामुळेच माओवादी मुख्य प्रवाहात येत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.