बंगळुरु -नांदेड एक्स्प्रेसच्या डब्याला आग, २३ ठार

बंगळुरु -नांदेड एक्स्प्रेसच्या एसी डब्ब्यात भीषण आग लागली. या आगीत २३ जणांचा मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले आहेत. आगीतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 28, 2013, 09:52 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, बंगळुरु
बंगळुरु -नांदेड एक्स्प्रेसच्या एसी डब्ब्यात भीषण आग लागली. या आगीत २३ जणांचा मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले आहेत. आगीतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आंध्र प्रदेशच्या पुट्टापार्थीजवळ ही दुर्घटना घडली. दोन मुलांसहित २३ जणांचा मृत्यू झालाय. अनंतपूर जिल्ह्यातील पुट्टापार्थीजवळ स्टेशनजवळ ही घटना घडली. रेल्वे डब्याला आग आगल्याचे समजताच पहाटे ४.२० वाजण्याच्या सुमारास रेल्वे थांबनिवण्यात आली.
रेल्वेच्या बी-१ थ्री टायर एसी कोचच्या डब्याला शॉर्टशर्कीटने ही आग आगल्याचे सांगण्यात येत आहे. या डब्यात जवळपास ६४ प्रवासी होते. डब्यामध्ये ७२ प्रवाशांची क्षमता होती. लागलेल्या आगीत २३ जणांचा मृत्यू झालेत तर आगीत ५ जण जखमी आहेत. मृत आणि जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
दोन गंभीर जखमी आणि एका भाजलेल्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळाला पोलीस आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.