दरोडेखोरांचा ननवर सामूहिक बलात्कार, सीआयडी चौकशीचे आदेश

नदिया जिल्ह्यातील गंगनापूर इथल्या कॉन्व्हेंटमध्ये शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी क्रौर्याची परिसीमा गाठत एका ननवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेचे तीव्र पडसाद शनिवारी परिसरात उमटले. संतप्त लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी रस्ते आणि रेल्वे वाहतूक जाम करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेच्या सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.

PTI | Updated: Mar 15, 2015, 09:14 AM IST
दरोडेखोरांचा ननवर सामूहिक बलात्कार, सीआयडी चौकशीचे आदेश title=

रानाघाट, कोलकाता : नदिया जिल्ह्यातील गंगनापूर इथल्या कॉन्व्हेंटमध्ये शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी क्रौर्याची परिसीमा गाठत एका ननवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेचे तीव्र पडसाद शनिवारी परिसरात उमटले. संतप्त लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी रस्ते आणि रेल्वे वाहतूक जाम करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेच्या सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.

पोलीस दरोडेखोरांच्या टोळीतील सदस्यांचा शोध घेत असून अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. जिल्हाधिकारी पी. बी. सलीम यांनी ही माहिती दिली. ज्या कॉन्व्हेंटमध्ये ही काळीमा फासणारी घटना घडली ते रानाघाट उपविभागात आहे. 

शाळेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास दरोडेखोरांची ही टोळी शाळेत घुसली आणि त्यांच्यापैकी तीन-चार लोकांनी पीडित ननला पहिलं त्रास दिला आणि नंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. या दरोडेखोरांनी कपाटात ठेवलेले १२ लाख रुपयेही लुटून नेले.  

सकाळी संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर शाळेच्या वसतिगृहातील अधिकाऱ्यांनी या वयस्कर ननला रानाघाट रुग्णालयात भरती केलं.

दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ननवरील सामूहिक बलात्काराचं हे प्रकरण धक्कादायक असल्याचं सांगून या घटनेच्या सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.