सीबीआयमध्ये ७५० जागा रिक्त

देशभरात सीबीआयमध्ये एकूण ७५० जागा रिक्त असून, या जागा भरण्यासाठी केंद्र लवकरच राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिणार आहे. 

Updated: Aug 31, 2015, 12:05 AM IST
सीबीआयमध्ये ७५० जागा रिक्त title=

नवी दिल्ली : देशभरात सीबीआयमध्ये एकूण ७५० जागा रिक्त असून, या जागा भरण्यासाठी केंद्र लवकरच राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिणार आहे. 

व्यापमं आणि चीट फंडसारखे गैरव्यवहार प्रकरणांचा तपास करताना सीबीआयमध्ये मनुष्यबळ कमी असल्याने अडचणी येत आहेत. त्याचप्रमाणे सीबीआयने सर्वोच्च न्यायालयाला अधिकाऱ्यांच्या कमी संख्येचीही माहिती दिली आहे. 

कार्मिक विभागाशी चर्चा केल्यानंतर सीबीआयमधील जागा भरण्याबाबत पत्र लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सीबीआयमधील ५० टक्के कर्मचारी वर्गांकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आलेला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.