पटेल आरक्षण आंदोलनात आतापर्यंत ९ ठार

गुजरातमध्ये पटेल समाजाच्या आरक्षण आंदोलनात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबाद, मेहसाणा आणि सुरतमध्ये कालपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सुरतमध्ये अजूनही तणावपूर्ण शांतता आहे.

Updated: Aug 27, 2015, 09:22 AM IST
पटेल आरक्षण आंदोलनात आतापर्यंत ९ ठार title=

अहमदाबाद : गुजरातमध्ये पटेल समाजाच्या आरक्षण आंदोलनात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबाद, मेहसाणा आणि सुरतमध्ये कालपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सुरतमध्ये अजूनही तणावपूर्ण शांतता आहे.

गुजरातमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. पटेल आरक्षण आंदोलनावरून गुजरातमध्ये हे रणकंदन पेटलं आहे. पटेल आरक्षणासाठी अहमदाबादमध्ये हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वाखाली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

या सभेत येऊन मुख्यमंत्र्यांनी आपलं निवदेन स्वीकारावं, अशी मागणी आंदोलकांची होती, मात्र मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या निवदेन स्वीकारण्यास आल्या नाहीत, जोपर्यंत त्या येत नाहीत तोपर्यंत आपण हटणार नाहीत अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने, पोलिसांनी हार्दिक पटेल यांना ताब्यात घेतलं, मात्र ताब्यात घेतल्यानंतर गुजरातच्या प्रमुख शहरांमध्ये जमावाने तोडफोड केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.