मोठ्या `नॅनो`साठी सायरस सज्ज!

By Shubhangi Palve | Last Updated: Thursday, January 3, 2013 - 11:46

www.24taas.com, नवी दिल्ली
‘स्मॉल वंडर’ ठरलेल्या नॅनोनं भारतात एकच धमाल उडवून दिली होती. त्यामुळेच नॅनो आणि टाटांनी लोकांच्या अपेक्षा आणखी उंचीवर नेऊन ठेवल्यात, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. याच अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आता सायरस मिस्त्री यांच्या खांद्यावर आलीय.
हीच छोटी कार आता आणखी काही बदलांसहित पुन्हा एकदा लोकांच्या समोर येण्याची योजना तयार करण्यात आलीय. टाटा यांचं हे छोटंसं स्वप्न आणखी काही बदलांसहित साकारण्याचं नवं स्वप्न आता सायरस मिस्त्री पाहत आहेत. या नवीन बदलांमध्ये आता नॅनोला एक लिटरचं इंजिन दिसू शकतं. या बदलांसहित मारुती ऑल्टोला जोरदार टक्कर देण्याची तयारी या नव्या नॅनोनं केलीय. माहितीनुसार, सध्याच्या नॅनोचं ६२४ सीसी इंजिन बदलून त्या जागी ९६६ सीसी इंजिन लावता येईल का? यावर टाटा मोटर्समध्ये खलबत सुरू आहे.
नॅनो पहिल्यांदा लॉन्च झाली तेव्हा अवघ्या एक लाखांमध्य बेसिक मॉडेल ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं होतं. याच नॅनोची सध्याची दिल्लीच्या शोरुम किंमत आहे १ लाख ५५ हजार ते २.१६ लाख. टाटा मोटर्सनं नॅनोच्या लॉन्चिंगपासून आत्तापर्यंत आत्तापर्यंत तब्बल २.२ लाख नॅनोच्या विक्रिची नोंद केलीय.

First Published: Thursday, January 3, 2013 - 11:46
comments powered by Disqus