अरविंद केजरीवालांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

अखेर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध केलंय. एकूण ३७ मतं मिळवत विश्वासदर्शक ठराव ‘आप’ सरकारनं जिंकला. विधानसभेत याबाबत मतदान पार पडलं.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 2, 2014, 06:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
अखेर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध केलंय. एकूण ३७ मतं मिळवत विश्वासदर्शक ठराव ‘आप’ सरकारनं जिंकला. विधानसभेत याबाबत मतदान पार पडलं.
यापूर्वी नववर्षाच्या शुभेच्छा देत अरविंद केजरीवाल यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. माझं कोणत्याही पक्षासोबत शत्रूत्व नाही. प्रामाणिकपणे सरकार चालवण्याचा आमचा उद्देश आहे. आम्ही सामान्य नागरीक आहोत.
केजरीवाल यांच्या भाषणातले मुद्दे
> देशाचं राजकारण भ्रष्ट झालंय
>देशातलं राजकारण सुधारण्याची गरज आहे.
> भ्रष्टाचाराच्या विरोधात कारवाई होईलच, मग कोणाही असो- केजरीवाल
> आम्हाला वाटतं व्हीआयपी कल्चर संपावं- केजरीवाल
> आज विधानसभेसमोर याला कोण पाठिंबा देणार हा प्रश्न- केजरीवाल
> दिल्लीतील लोकायुक्त कायदा खूप कमजोर
> ठेकेदारांचं होणारं शोषण थांबवलं पाहिजे
> पक्ष आणि सरकारसाठी समर्थन मागतोय
> महिलांच्या सुरक्षेसाठी स्पेशल सेल तयार करण्याची गरज आहे.
> सरकारी रुग्णालयांमध्ये उत्तम दर्जाची व्यवस्था हवी
> खाजगी शाळांची फी कमी करायला हवी
> सरकारी शाळांची संख्या वाढवण्याची गरज
> दिल्लीच्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा दर्जा मिळायला पाहिजे
> दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा हवा
> ज्याचा कोणीही नसतो, त्याचा देव आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.